ठाणे : महापालिका क्षेत्रात पा‌ळीव तसेच भटक्या प्राण्यांनी आजारी पडले किंवा अपघातात जखमी झाले तर त्यांच्यावर शहरात उपचाराची सुविधा उपलब्ध नसून त्याचबरोबर या प्राण्यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्माशानभुमीची सुविधा नसल्याने पशुपालकांसह पालिकेची मोठी अडचण होते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आता पा‌ळीव तसेच भटक्या प्राण्यांकरीता रुग्णालय आणि स्माशानभुमी उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून त्यासाठी पडले गावातील कोंडवाड्याच्या जागेवर प्राणी रुग्णालय आणि स्माशनभुमी उभारता येऊ शकते का, याचाही विचार पालिकेकडून केला जात आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत पुस्तक आदान-प्रदान सोहळ्याचे आयोजन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळ्याचा श्रीगणेशा

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

ठाणे महापालिकेकडून शहरात विविध पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. याशिवाय, शहरात मानवी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असले तरी शहरातील भटक्या व पाळीव प्राण्यांच्या आजारपणावर उपचार करणे आणि मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करणे यासाठी कोणतीही सुविधा शहरात उपलब्ध नाही. काही वर्षांपुर्वी शीळ भागात एका घोड्याला दफन करण्यात आले होते. या प्रकारानंतर स्थानिकांनी पालिकेवर टिका केली होती. त्याचे पडसाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्याचवेळेस मृत प्राण्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहरात भटक्या व पाळीव प्राण्यांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची सुविधा उपलब्ध नाही.  यामुळे मुंबईतील परळ भागातील रुग्णालयात प्राण्यांना उपचारासाठी नेण्यात येते.

हेही वाचा >>> ठाणे : हिरानंदानी मेडोज परिसरातील टपरीचालकांच्या मुजोरीला लगाम; पदपथावरील बेकायदा टपऱ्या पालिकेने हटविल्या

ठाणे शहरात श्वान, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. तसेच शहरात आजही घोडागाडी चालविण्यात येत आहेत. अनेक घरांमध्ये श्वान, मांजर या प्राण्यांचे स्थान घरातील सदस्याइतकेच महत्त्वाचे असते. आजार, अपघात किंवा वयोमानामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाला तर, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने पशुपालकांची मोठी अडचण होते. भटक्या प्राण्यांसाठी काही खासगी संस्था कार्यरत असल्या तरी पालिकेकडून अशा प्राण्यांसाठी पालिकेमार्फत रुग्णालय आणि स्माशानभुमीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हे प्राणी मृत पावल्यास पालिकेचीही मोठी अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने आता पा‌ळीव तसेच भटक्या प्राण्यांकरीता रुग्णालय आणि स्माशानभुमी उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून त्यासाठी पडले गावातील कोंडवाड्याच्या जागेवर प्राणी रुग्णालय आणि स्माशनभुमी उभारता येऊ शकते का, याचाही विचार पालिकेकडून केला जात आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.