लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील एमआयडीसीतील गोळवली भागातील एका कंपनीत मागील दोन महिन्याच्या कालावधीत या कंपनीत काम करणाऱ्या दोन कामगारांनी चार लाख २० हजार रुपये किमतीच्या सामानाची चोरी केली आहे. कंपनीच्या हा प्रकार लक्षात येताच या कामगारांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

homes, mill workers, mmrda
संथ कारभाराचा गिरणी कामगारांना फटका, रांजनोळीतील १२४४ घरांची दुरुस्ती रखडलेली; २५२१ घरांची सोडतही लांबणीवर
police maharashtra
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी ‘घरगडी’! राज्यभरात तीन हजारांवर पोलीस…
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
EPS-95 pensioner
इपीएस-९५ पेन्शनधारक भाजपवर नाराज, म्हणाले, “विरोधात…”

राजेंद्र महाजन, हेमराज सवाकरे अशी आरोपी कामगारांची नावे आहेत. ते डोंबिवलीत राहतात. कलर कोटिंग इंडिया कंपनीचे व्यवस्थापक जिग्नेश छेडा (रा. मुलुंड) यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत हा चोरीचा प्रकार या दोन्ही कामगारांनी केला आहे.

हेही वाचा… डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील रस्ते वाहन कोंडीच्या विळख्यात

पोलिसांनी सांगितले, एमआयडीसीतील गोळवली भागात कलर कोटिंग इंडिया कंपनी आहे. या कंपनीत आरोपी राजेंद्र, हेमराज कामगार म्हणून काम करतात. एप्रिल ते जून या कालावधीत या दोन्ही आरोपींनी कंपनी व्यवस्थापनाची नजर चुकवून कंपनीतील किमती सामान लबाडीने चोरुन नेले. या सामानाची किंमत चार लाखाहून अधिक आहे. सामान चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यामध्ये राजेंद्र, हेमराज यांची नावे पुढे आली.

हेही वाचा… गुन्हा दाखल करण्यास विलंब, अभियंत्यांना मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद

या दोन्ही कामगारांनी कंपनीचे आर्थिक नुकसान होईल अशा प्रकारची कृती केल्याने व्यवस्थापक छेडा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करुन कंपनीने त्यांच्या विरुध्द कारवाई सुरू केली आहे.