ठाणे : ओएलएक्स या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर विक्रीसाठी असलेला सुमारे अडीच लाख रुपयांचा लॅपटॉप घेऊन फरार झालेल्या दोघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. पीटर सॅन्चेस (३०) आणि सिद्धेश सावंत (३०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोडबंदर येथे राहणारे प्रकाश हेगडे यांचा मुलगा परदेशात शिक्षण घेण्यासाठी जात असल्याने त्यांनी त्याच्याकडे असलेला नवा कोरा लॅपटॉप २ लाख ३० हजार रुपयांमध्ये विक्रीसाठी काढला होता. त्यासाठी त्यांनी ओएलएक्सवर लॅपटॉप विक्रीसाठी जाहिरात केली होती. हा लॅपटॉप पीटर आणि सिद्धेश यांनी संकेतस्थळावर पाहिल्यानंतर त्यांनी हेगडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पीटर आणि सिद्धेश हे दोघेही लॅपटॉप पाहण्यासाठी ठाण्यात आले. लॅपटॉप पसंत असल्याचे दाखवत त्यांनी २ लाख ३० हजार रुपयांचा धनादेश हेगडे यांना दिला. हा धनादेश वटविण्यासाठी हेगडे यांचा मुलगा दोघांनाही घेऊन बँकेत निघाला. बँकेजवळ आले असता, पीटर आणि सिद्धेश हे लॅपटॉप घेऊन बँकेबाहेर उभे राहिले, तर हेगडे यांचा मुलगा बँकेत गेला. मात्र हा धनादेश बनावट असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हेगडे यांचा मुलगा बँकेबाहेर आले असता पीटर आणि सिद्धेश लॅपटॉप घेऊन फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हेगडे यांनी याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested for cheating on olx akp
First published on: 11-02-2021 at 00:39 IST