scorecardresearch

कल्याणमध्ये दुचाकीच्या धडकेत गर्भवती महिला, बालिका जखमी

गंधारे भागातील मुंबई विद्यापीठाजवळ अग्रसेन चौकात एका तरुणाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून पायी चाललेल्या एक गर्भवती महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या बालिकेला जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले आहे.

two wheeler hit Pregnant woman kalyan
कल्याणमध्ये दुचाकीच्या धडकेत गर्भवती महिला, बालिका जखमी (प्रातिनिधिक छायाचित्र)

कल्याण – कल्याण पश्चिमेतील गंधारे भागातील मुंबई विद्यापीठाजवळ अग्रसेन चौकात एका तरुणाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून पायी चाललेल्या एक गर्भवती महिला आणि तिच्या दोन वर्षांच्या बालिकेला जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले आहे.

गर्भवती महिलेला दुचाकीच्या धडकेने त्रास सुरू झाला आहे. याप्रकरणी श्री. काॅम्पलेक्स परिसरात राहणाऱ्या स्वाती पवार यांनी बेदरकारपणे दुचाकी चालविणारा विवेक सुधीर साबळे (१९, रा. श्रीराम काॅलनी, मिलिंद नगर, कल्याण पश्चिम) याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची हत्या

हेही वाचा – घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात एकाचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले, स्वाती पवार मंगळवारी दुपारी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह कल्याण पश्चिमेतील गंधारे भागातील मुंबई विद्यापीठ भागातील अग्रसेन चौकातून पायी चालल्या होत्या. त्या गर्भवती आहेत. श्वास रुग्णालय भागातून जात असताना पाठीमागू भरधाव वेगाने आरोपी विवेक साबळे दुचाकीवरून आला. त्याने काही कळण्याच्या आत तक्रारदार स्वाती, त्यांच्या मुलीला दुचाकीची जोराची धडक दिली. मुलगी वर्तिकाच्या पायाला दुचाकीची धडक बसल्याने जखम झाली आहे. अचानक दुचाकीचा धक्का बसल्याने स्वाती यांना त्रास होत आहे. चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 12:18 IST
ताज्या बातम्या