बदलापूर : उल्हास आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असतानाच ‘गटारगंगा होण्याच्या वाटेवर असलेल्या उल्हास नदीचे प्रदूषित पाणी मराठवाड्याला नेणार का,’ असा खोचक प्रशद्ब्रला उल्हास नदी बचाव कृती समितीने केला आहे.

हेही वाचा >>> हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्याने डोंबिवलीत ब्राह्मण महासंघाची निदर्शने

उल्हास नदी खोऱ्यातील ३४.८० टीएमसी व वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी असे अतिरिक्त पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अहवाल तयार करण्यासाठी जलसंपदा विभागाने ६१ कोटी ५२ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिली. यावर उल्हास नदी बचाव कृती समितीने उल्हास नदीने आक्षेप घेतला आहे. रसायन मिश्रित सांडपाणी नदीत मिसळले जाते. नदी पात्रात आणि किनाऱ्यावर अनधिकृत बांधकामे आहेत. जलपर्णीमुळे पाण्याची पातळी सातत्याने खालावत आहे. पूर रेषेबाबत स्पष्टता नाही. अशा स्थितीत मराठवाड्याला प्रदूषित पाणी देण्याचे ‘पाप’ करू नका, असे आवाहन समितीने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात पूरस्थिती होऊ नये नद्या जोडण्याचे निर्णय घेतले जातात. मात्र गंगेचा काठ पुरामुळेच सुपीक झाला आहे. आता अतिक्रमणांमुळे पूर भयावह वाटतो. पूर्वीच्या काळी दस्तऐवजांमध्येही पुरामुळे नुकसान झाल्याची कोणतीही नोंद आढळत नाही. – अविनाश हरड, नदी अभ्यासक (अश्वमेध प्रतिष्ठान)