शहरात ४३ हजार ६५४ नागरिकांचे लसीकरण

भाईंदर: मीरा-भाईंदर शहरात करोना लसीकरणाला गती प्राप्त झाली असून आतापर्यंत ४३ हजार ६५४ नागरिकांना लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यात निम्म्याहून अधिक वृद्ध व्यक्तीचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून करोनाविषयक नियमावली लागू करण्यात आली असून, लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला जात आहे. याकरिता नऊ शासकीय लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून तीन खासगी रुग्णालयांनादेखील लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला काहीशा प्रमाणात गती प्राप्त झाली असून ४३ हजार ६५४ नागरिकांना लशीचा डोस देण्यात आला आहे.

यात रोज एकूण ६०० नागरिकांना लस देण्याचे धैर्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयात ३०० व शासकीय रुग्णालयात ३०० लशीच्या मात्रा देण्यात येत आहेत. यामध्ये आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, वृद्ध व्यक्ती आणि ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधी  नागरिकांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे खासगी रुग्णालयात लशीचे डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे शासकीय केंद्रांपेक्षा अधिक असून यात प्रति दिवस वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

लसीकरणाची  आकडेवारी

                                    प्रथम     द्वितीय    एकूण

आरोग्य कर्मचारी —     ७२५०       ३९७२          ११२२२

शासकीय कर्मचारी-       ३५०१         ७२७          ४२२८

सहव्याधी नागरिक-      ५३६६          ०             ५३६६

वृद्ध नागरिक –             २२८३८         ०             २२८३६

एकूण –               ३८९५५         ४६९९          ४३६५४