आपले कर्तव्य बजावताना मारहाणीत जखमी झालेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातदेखील शुक्रवारी रात्री अशाचप्रकाराची पुनरावृत्ती होताना दिसली. ठाण्यात तीनहात नाका परिसरात ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाला एका मद्यपी गाडीचालकाने फरफटत नेले. मात्र, घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या सतकर्तेमुळे या वाहतूक पोलिसाचा जीव बचावला. या घटनेत वाहतूक पोलीस कर्मचारी नरसिंग महापुरे जखमी झाले आहेत. नरसिंह महापुरे ड्युटीवर असताना त्यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्याच्या नशेत असलेल्या वाहनचालकाने नरसिंग महापुरे यांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेले. मात्र, गाडीने अर्धा किलोमीटर पार केल्यानंतर याठिकाणी उपस्थित असणारे नागरिक महापुरे यांच्या मदतीला धावून गेले आणि त्यांनी गाडी थांबविली.यावेळी नागरिकांनी वाहनचालक योगेश भामरेला गाडीतून बाहेर काढत चांगलाच चोप दिला. दरम्यान, पोलिसांकडून योगेश भामरेला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दुरध्वनीवरून नरसिंग महापुरे यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे समजते. विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे यांनी पोलिसांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात नाकाबंदीदरम्यान दुचाकीस्वाराने हवालदाराला धडक दिल्याची घटना घडली होती. यामध्ये हवालदार देवीदास निंबाळकर जखमी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 धुळ्यात दोन गटातील हाणामारीत पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी
धुळ्याच्या साक्रीत दोन गटांच्या हाणामारीत पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोले गंभीर जखमी झाले आहेत. हुंडा प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्याने दोन गटात साक्री पोलिस ठाण्यात मोठा वाद पेटला. या वादात दोन्ही बाजुच्या जमावाला शांत करण्यासाठी मध्ये पडलेल्या प्रेमनाथ ढोले यांना यावेळी जमावाने जबर मारहाण केली. एका गटाने लाठ्या-काठ्यांसह दगडांचा वापर केला. यादरम्यान प्रेमनाथ ढोलेंना दगड आणि काठीचा जबर मार लागला. या वादातील आरोपी फरार असून, मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle drag traffic police in thane
First published on: 03-09-2016 at 13:38 IST