ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदारांची यादी पालिका निव़डणुक विभागाने जाहीर केली आहे. या यादीनुसार पालिका क्षेत्रात एक लाख ६२ हजार ८५ हजार मतदार वाढले असून त्यात स्त्री मतदारांची संख्या ८४ हजार ८० इतकी आहे. सर्वाधिक म्हणजेच ४४ हजार १३४ इतके मतदार प्रभाग क्रमांक ४२ मध्ये आहेत तर, त्या प्रभाग क्रमांक २ मध्ये ३९ हजार ८६३ इतके आहेत.

ठाणे महापालिकेची निवडणुक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तविली जात असून राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाकडून निवडणुक  पुर्वतयारी केली जात आहे. काही दिवसांपुर्वी आरक्षण प्रक्रीया पार प़डली. त्यापाठोपाठ पालिका निवडणुक विभागाने मतदार याद्या तयार कऱण्याचे काम सुरु केले आहे. राज्य निव़ड़णुक आयोगाने २३ जून रोजी प्रारूप मतदार यादी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका निवडणुक विभागाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यात एकूण मतदारांची संख्या १३ लाख ९० हजार ६९१ इतकी आहे. त्यात ७ लाख ४५ हजार ४२४ इतके पुरुष मतदार तर, ६ लाख ४५ हजार १६७ इतक्या स्त्री मतदार आहेत. तसेच इतर मतदारांची संख्या १०० इतकी आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळेस १२ लाख २८ हजार ६०६ इतके मतदार होते. त्यात ६ लाख ६७ हजार ५०४ पुरुष तर ५ लाख ६१ हजार ८७ स्त्री मतदार होते. इतर मतदारांची संख्या १५ होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एक लाख ६२ हजार ८५ हजार मतदार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यात सर्वाधिक म्हणजेच ८४ हजार ८० इतक्या स्त्री मतदार आहेत. तर, ७७ हजार ९२० इतके पुरुष मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या ८५ इतकी आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
Scam transport department, Andheri RTO
परिवहन विभागात घोटाळा, ‘अंधेरी आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे १०० हून अधिक वाहनांची नोंदणी
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत

प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांवर २३ जून ते १ जुलै या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सुचना मागविण्यात येणार आहेत. यामध्ये लेखनिकांच्या काही चूका असल्यास त्या सुधारणे,  दुसऱ्या  प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास ते वगळणे, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नाव असूनही, महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आले असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे याबाबत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर पालिका निवडणुक विभागाकडून अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.