डोंबिवली – पालिकेच्या डोंबिवली विभागाअंतर्गत पाणीपुरवठा आणि जल-मलनिस्सारण विभागात उपअभियंत्यांच्याअंतर्गत काम करण्यासाठी मागील सात ते आठ महिन्यांपासून कनिष्ठ अभियंते नाहीत. उपअभियंत्यालाच स्वतासह कनिष्ठ अभियंत्यांची कामे करावी लागत असल्याने डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयांमध्ये पाणीपुरवठा, मल-जलनिस्सारण विभागात नागरिकांची अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत.

गेल्या वर्षी २० वर्षांनंतर सर्वच अभियंत्यांच्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नत्ती झाल्या. अनेक वर्षांनी बढती मिळाल्याने हातची कामे सोडून कनिष्ठ अभियंते आपल्या पदोन्नत्तीच्या पदावर हजर झाले. बहुतांशी कनिष्ठ अभियंते प्रभागस्तरावर कार्यरत होते. पदोन्नत्तीने हजर झालेल्या रिक्त जागी प्रशासनाने पर्यायी कोणतीही व्यवस्था किंवा त्या ठिकाणी कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्त केले नाही. त्यामुळे प्रभागांमधील पाणीपुरवठा, जल, मलनिस्सारण विभागात कामे करण्यासाठी अभियंते नसल्याने नागरिकांची कामे अडून राहिली आहेत.

Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

हेही वाचा – श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला भाजपाचाच विरोध? म्हणे, “दुसरा उमेदवार सहन करणार नाही”, कल्याणमध्ये मतभेद उघड!

प्रभागातील क्षेत्रस्थळावर जाणे, तेथील सर्वेक्षण, पाहणी अहवाल देण्याची कामे कनिष्ठ अभियंते करतात. डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील ह प्रभाग क्षेत्रात पाणीपुरवठा, जल-मलनिस्सारण विभागात काम करण्यासाठी कनिष्ठ अभियंते नाहीत. या रिक्त जागांवर तातडीने कनिष्ठ अभियंते उपलब्ध करून द्यावेत. उपअभियंत्यांच्या अंतर्गत काम करण्यासाठी लिपिक, शिपाई कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी डोंबिवलीतील उपअभियंत्यांनी शहर अभियंता विभागाकडे केली आहे.

पदोन्नत्ती झालेल्या काही अभियंत्यांनी काही दिवस स्वतावरील जबाबदारीची प्रभागातील कामे काही दिवस दायित्व म्हणून केली. पदोन्नत्ती झाली असताना खालच्या टेबलवरील कामे किती दिवस करायची म्हणून बहुतांशी पदोन्नत्ती झालेले कनिष्ठ अभियंते आपल्या बढतीच्या जागी हजर झाले. या रिक्त जागा अद्याप भरण्यात न आल्याने प्रभागस्तरावर नागरिकांची कामे अडून राहिली आहेत.

पाणीपुरवठा विभागातून जल जोडण्या मंजूर करणे, वाढीव पाणी देयक असेल तर त्याची तपासणी करून ते कमी करण्यासाठी वरिष्ठांना कळविणे, प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी चोरीच्या नळजोडण्या घेण्यात येतात. अशी तक्रार आली तर तात्काळ घटनास्थळी जाणे. प्रभागांमध्ये काँक्रिटची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदकाम झाले आहे. काही ठिकाणी बंदिस्त नाला बांधण्याची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी बेकायदा इमारतींना चोरून नळ जोडण्या घेण्यात येतात. त्याची पाहणी करावी लागते. ही कामे करण्यासाठी प्रभागस्तरावर कनिष्ठ अभियंते नाहीत. डोंबिवलीतील ह, ग, फ प्रभागांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा – “सरस्वतीबरोबर कधीही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत, कारण…”, मनोज सानेचा पोलीस तपासात दावा

एक उपअभियंत्याला एकाचवेळी पालिका मुख्यालयात जाऊन वरिष्ठांच्या बैठकीला हजेरी लावणे, प्रभागस्तरावरील स्वताची, कनिष्ठ अभियंत्यांची कामे करावी लागतात. नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. शहर अभियंता कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांना या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची चर्चा आहे. नागरिकांनी रखडलेल्या कामाविषयी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांना संपर्क केला की ते कधीच प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांचा त्यांच्या विषयीचा रोष वाढला आहे.

डोंबिवलीतील कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त पदांविषयी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांना दोन ते तीन वेळा संपर्क केला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सामान्य प्रशासन विभागही विभागाकडून प्रस्ताव येत नाहीत तोपर्यंत स्वताहून काहीच निर्णय घेत नसल्याने या विभागाविषयी नाराजीचा सूर आहे.