बदलापूर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना शनिवारी दुपारी एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवरून दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल गाडीखाली चिरडून या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे वय अंदाजे ५० वर्षे आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरात रुळाजवळच्या वाटा बंद केल्या होत्या. मात्र, भाजपच्या स्थानिक नगरसेवकाने याबाबत आक्षेप नोंदवला होता. गेल्याच आठवडय़ात अज्ञातांनी या वाटा पुन्हा मोकळ्या केल्या.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2016 रोजी प्रकाशित
बदलापूरमध्ये लोकलखाली महिलेचा मृत्यू
बदलापूर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना शनिवारी दुपारी एका महिलेचा मृत्यू झाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 03-04-2016 at 02:14 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman killed in train accident