भगवान मंडलिक

बालपणापासून अंगीभूत असलेले धाडस, आव्हान शौर्य हे गुण. त्याला आई वडिलांनी दिलेली बळकटी. अशा संस्कारक्षम घरात वाढलेल्या तृष्णा चेतन जोशी या कल्याण मधील महिला गेल्या दहा वर्षापासून मालगाडीचे सारथ्य करत आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोको पायलट तृष्णा जोशी यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडला.

Chandrapur, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar,
चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

“आम्ही कल्याणचे मूळ रहिवासी. आई-वडील मोठी बहीण असा आमचं चौकोनी कुटुंब. शालेय जीवनापासून धाडस, साहस, आव्हाने स्वीकारणे हे गुण माझ्या अंगीभूत होते. वडिलांचा धाडसी स्वभाव. आईने नेहमी आव्हाने स्वीकारून पुढे कसे जायचे हे संस्कार केले. घरामध्ये आम्ही बहिणी असल्यातरी आई-वडिलांनी आमच्याकडे मुली म्हणून कधीच बघितले नाही,  तशी वागणूक दिली नाही. संस्कारक्षम मोकळ्या वातावरणात वावरण्याची त्यांनी आम्हाला नेहमीच संधी दिली. मुलगी आहे म्हणून हे करू नकोस ते करू नकोस असा कधीही दबाव आणला नाही. त्यामुळे माझ्या अंगीभूत गुणांना चालना आणि अधिक बळ मिळालं,” असं तृष्णा जोशी सांगतात.

बालपणापासून खाकी वर्दी, लष्करी गणवेश यांचे आकर्षण होते. त्यामुळे शालेय जीवनापासून पोलीस किंवा लष्करात भरती व्हायचे असा निश्चय मनाने केला होता. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रयत्नात असतानाच मध्य रेल्वेत नोकरीला सलेले माझे वडील अचानक खूप आजारी झाले. ते अंथरुणाला खिळून राहिले. कुटुंबावर हे मोठं अचानक संकट आलं. दोन्ही बहिणींची जबाबदारी वाढली. त्यामुळे पोलीस किंवा लष्करात जाण्याचा बेत रद्द करावा लागला.

अखेर २००८ मध्ये अनुकंपा तत्वावर प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ म्हणून मध्य रेल्वेत नोकरीला लागले. या अनुभवातूनच २०१३ मध्ये खात्यांतर्गत रेल्वेची असिस्टंट लोको पायलट म्हणून परीक्षा दिली. यादरम्यान माझ्या विवाहाची तयारी झाली. त्यामुळे लोको पायलटची परीक्षा देऊ नये असा विचार मनात आला. पतीने आणि कुटुंबीयांनी परीक्षा देण्यासाठी मला आग्रही केले. परीक्षा पास झाले. मी असिस्टंट लोको पायलट म्हणून काम करू लागले. विवाहानंतर कुटुंब, कर्तव्य, दोन दिवस बाहेर राहणे असे कसरतीचे आणि आव्हानात्मक वातावरण होते. अशा परिस्थितीत पतीने मला खूप धीर दिला. मला जे जमले नाही ते तू कर, कुटुंब मी बघतो असे सांगून कर्तव्य करण्यात मला मोठं पाठबळ दिलं. कुटुंबीयांनी मला आधार दिला. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून मी सहाय्यक लोको पायलट म्हणून काम केले, असं त्या सांगतात.

गेल्या वर्षीच मला लोको पायलेट म्हणून पदोन्नती मिळाली. रोह, जेएनपीटी, लोणावळा, दिवा या मध्य रेल्वेच्या मार्गीकेवर मालगाडी चालवण्याचे काम करत आहे.,असे लोकोपायलट तृष्णा जोशी यांनी सांगितले.

मोटार चालवताना वाहनचालकाला फक्त समोर नजर ठेवून राहावे लागते. पण मालगाडी चालवताना समोरची रेल्वे मार्गिका, सिग्नल, इंजिन ला जोडलेले बावन्न डबे, इंजिनचे वजन, डब्यांची क्षमता, समोरून येणाऱ्या गाड्या अशा चारी बाजूने लक्ष ठेवून लोकोपायलटला आपले कर्तव्य करावे लागते. या कालावधीत मोबाईल बंद ठेवण्यात येतो. अनेक वेळा मालगाडीची धाव २४ तास असते. त्यामुळे त्या कालावधीत घराबाहेर राहावे लागते. महिला असली तरी पुरुष सहकाऱ्यांचे, वरिष्ठांचे चांगले मार्गदर्शन आणि सहकार्य असते. त्यामुळे कर्तव्य करण्यात कधीही अडथळा येत नाही. अनेक वेळा मालगाडी दुर्गम, निबिड जंगलातील रेल्वे मार्गीकेवर रात्रीच्या वेळी थांबते, मुसळधार पाऊस सुरू असतो, त्यावेळी जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी यांचे मोठे भय असते. अशा परिस्थितीत इंजिन खाली उतरून इंजिन, डब्यांची पाहणी कर्तव्य म्हणून करावे लागते, असे जोशी यांनी सांगितले .

“प्रत्येक महिलेने सक्षमतेने जीवन प्रवासात येणाऱ्या आव्हानांवर मात करून, त्यात तावून सुलाखून बाहेर पडून स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा,” असा संदेश लोकोपायलट तृष्णा जोशी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून दिला आहे.