scorecardresearch

Premium

नालासोपाऱ्यात लग्न सोहळ्यात रक्तरंजित थरार

लग्न सोहळ्यात डीजेच्या तालावर नृत्य सुरू असतानाच वाद झाला आणि वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाची हत्या; दोन जण जखमी

लग्न सोहळ्यात डीजेच्या तालावर नृत्य सुरू असतानाच वाद झाला आणि वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. नालासोपारा येथे रविवारी ही घटना घडली असून तुळींज पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.

wife killed her husband by beating with wooden rolling
बापरे! पत्नीने पतीची लाटण्याने मारून केली हत्या; अन् पोलिसांसमोर रचला आत्महत्येचा बनाव
rape with minor girl by given drugs
लॉजवर नेऊन गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
arrested
आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री प्रकरण : मुख्य दलालाला मुंबईतील माहिममधून अटक
crime news
बाणेरमधील धक्कादायक घटना; बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून तरुणाची आत्महत्या

नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील बजरंग नगरात रविवारी लग्न सोहळा होता. रात्री साडेअकराच्या सुमारास मंडपात डीजेच्या तालावर नृत्य सुरू होते. या वेळी बंटी ऊर्फ योगेश साविनकर हा तरुण नृत्य करताना अश्लील हावभाव करत होता. त्याला मनोज सुर्वे याने आक्षेप घेतला आणि तरुणांच्या या गटाला नृत्य करण्यापासून रोखले. त्या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. रात्री साडेअकराच्या सुमारास बंटी आपल्या साथीदारांना घेऊन तिथे आला आणि त्याने मनोजला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून तिथे असलेला विनय डिचवलकर (२१) हा मनोजला वाचवायला मध्ये पडला आणि त्याने हल्लेखोरांना रोखायचा प्रयत्न केला. त्या वेळी हल्लेखोरांनी विनयवर चाकूने वार केले. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाली. त्यात नरेश शर्मा आणि योगेश सानिवकर हे तरुण जखमी झाले.

नरेशवर नालासोपाऱ्याच्या अलायन्स रुग्णालयात तर योगेशवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी जखमी नरेश शर्मा आणि योगेश सानिवकर यांच्यासह पाच जणांवर हत्या, दंगल आदी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे, तर रुग्णालयात असलेल्या दोन आरोपींना नंतर अटक केली जाणार असल्याचे तुळींज पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात तणाव पसरला असून पोलिसांनी या भागात बंदोबस्त ठेवला आहे

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youth killed in wedding ceremony in nalasopara

First published on: 18-07-2017 at 02:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×