मानवाची जितकी प्रगती झाली तितक्याच जोमाने विज्ञान, संशोधन आणि वैद्यकशास्त्रालाही वाकविणाऱ्या काही प्राणघातकी आजारांचा बागुलबुवा त्याच्यासमोर सातत्याने धरला. १९९०चे दशक एड्सच्या (एचआयव्ही) दहशतीमध्ये राहिले. त्यानंतर सार्स, बर्ड फ्लू आणि आता आधीच्या सर्व रोगांच्या घातकपणाला मागे टाकणाऱ्या ‘इबोला’ या रोगाचा बोलबाला सर्वत्र वेगाने पसरला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये हजारांहून बळी घेणाऱ्या या आजारावर अक्सीर इलाज शोधून काढता आलेला नाही. तो ज्या व्यक्तीला होतो त्याचा तो शेवटचा आजार ठरतो. त्यामुळे या रोगाची सध्याची जीवघेणी घोडदौड पाहून जागतिक आरोग्य संघटनेने ‘आरोग्य आणीबाणी’ घोषित केली आहे. सध्या या रोगाबाबत झळ न पोहोचलेल्या राष्ट्रांनी सुरू केलेल्या चुकीच्या भयचर्चाना टाळून, या आजाराविषयी ज्ञानविस्तार..
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इबोला’ हा विषाणू नवीन नाही त्याचे अनेक आविष्कार आतापर्यंत जगाने पाहिले आहेत. या विषाणूने पहिल्यांदा १९७६ मध्ये काँगोतील यामबुकटू व सुदानमधील नाझरा येथे संसर्ग पसरवला होता. त्यावेळी तेथील लोकसंख्याही तशी कमी होती. केवळ ५० रुग्ण आढळून आले . गेली पंधरा वर्षे हा इबोला विषाणू दबून होता, पण आता त्याने परत डोके वर काढले आहे. हा विषाणू जेव्हा गायब होतो तेव्हा तो निसर्गाच्या सान्निध्यातच असतो. तो वटवाघळे व माकडे यांच्यात राहतो पण विशेष म्हणजे त्यांना त्याचा काही त्रास होत नाही. काँगोमध्ये इबोला नदीकाठच्या प्रदेशात तो प्रथम आढळून आला म्हणून त्याला इबोला विषाणू असे म्हणतात.आफ्रिकेत या विषाणूच्या वेगवेगळ्या प्रजाती तयार झालेल्या आहेत. २०१४ मधील इबोलाची साथ ही इतिहासातील सर्वात मोठी साथ असल्याचे मानले जात आहे.
इबोला विषाणू रोगाची (ईव्हीडी) साथ सध्या पश्चिम आफ्रिकेतील देशात असून त्याने सातशेवर बळी घेतले आहेत, सिएरा लिओन, लायबेरिया, गीनी तसेच नायजेरिया या देशांमध्ये तो पसरला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सध्याची जी साथ आहे त्यात मृत्यूचे प्रमाण ९० टक्के असून, इबोला विषाणूची झैरे या देशात सापडलेली प्रजाती नवीन आहे.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about ebola virus
First published on: 16-08-2014 at 01:10 IST