भाषा शिकणे ही शारीरिक क्रिया नाही, तर ते माणसाच्या जनुकातच असते. बालपणापासून जनुकांमुळे माणसाची भाषा विकसित होते असे अलीकडच्या संशोधनातून दिसून आले आहे. ब्रिस्टल विद्यापीठाच्या मेडिकल रीसर्च कौन्सिलच्या इंडिग्रेटिव्ह एपिडिमियॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, रोबो २ या जनुकाच्या नजीक जे बदल होतात त्याचा संबंध आपल्या भाषा शिकण्याशी असतो. लहानपणी मूल भाषाविकासाच्या काळात जे शब्द शिकते त्यांची संख्याही त्याच्याशी निगडित असते. मुले वयाच्या दहा ते पंधराव्या महिन्यापासून शब्द तयार करू लागतात व त्यांची वाढ होते तसा शब्दसंग्रह वाढत जातो. १५ ते १८ महिन्यांत ५० शब्द, १८ ते ३० महिन्यांत २०० शब्द, सहाव्या वर्षी १४ हजार शब्द व माध्यमिक शाळा सोडल्यानंतर ५० हजार शब्द मुले शिकतात. १५ ते १८ व्या महिन्यात  मुले एक-एक शब्द वापरून संदेशवहन करतात. तोपर्यंत त्यांचे भाषाकौशल्य विकसित झालेले नसते व नंतर दोन शब्द, व्याकरणीय रचना शिकतात. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. बोलण्यातील अडचणींचा आजार असलेल्या डिसलेक्सियाशी निगडित असलेल्या गुणसूत्र ३ या भागावरही संशोधनात प्रकाश टाकण्यात आला आहे. रोबो २ जनुकात रोबो २ प्रथिन तयार करण्याची सूचनावली असते. हे प्रथिन मेंदूतील पेशींमध्ये व चेतापेशींमध्ये असलेल्या रसायनांना आवाज शिकण्याचे, भाषा शिकण्याचे आदेश देते. रोबो २ प्रथिन हे रोबो या दुसऱ्या प्रथिनाशी आंतरक्रिया करते. रोबो प्रथिनाचा संबंध वाचनातील अडचणी व ध्वनिसंग्रहातील अडचणींशी आहे. मुलांमध्ये भाषा विकसित होत असताना त्यात जनुकांची भूमिका काय असते यावर या संशोधनातून प्रकाश पडला आहे. रोबो प्रथिन व भाषिक कौशल्ये यांचा जवळचा संबंध असल्याचे डॉ. बीट सेंट पोरकेन व डेव्ही स्मिथ यांनी सांगितले.
भाषाकौशल्याशी संबंधित प्रथिनाचे नाव-
रोबो (आरओबीओ)
मुलांची भाषा क्षमता –
१५ ते १८ महिन्यांत – ५० शब्द
१८ ते ३० महिन्यांत – २०० शब्द,
सहाव्या वर्षी -१४ हजार शब्द
माध्यमिक शाळा सोडताना- ५०  हजार शब्द

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Language development in children belongs to gene
First published on: 27-09-2014 at 08:01 IST