हृदयविकारावरील स्टॅटिन औषधांना पर्याय शोधून काढण्यात आला आहे. ही औषधे सध्या हृदयविकारावर मोठय़ा प्रमाणावर वापरली जातात व ती कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे म्हणून प्रसिद्ध आहेत. लाखो लोकांना आतापर्यंत त्यांचा फायदा झाला असला तरी काही रुग्णांना या स्टॅटिन औषधांचा त्रास होतो. एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटिन या प्रकारच्या कोलेस्टेरॉलची हृदयविकारात नेमकी भूमिका काय असते याचाही उलगडा नवीन संशोधनातून होत आहे. काहींच्या मते स्टॅटिन औषधे ही हृदयविकार केवळ एलडीएलचे प्रमाण कमी करून टाळतात असे नाही, तर त्यामुळे वेदनाही त्यात कमी होते. नवीन अभ्यासानुसार एलडीएल हाच घटक महत्त्वाचा असून त्याची पातळी कमी राखणे फार महत्त्वाचे असते. सहा वर्षांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सोमवारी अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वार्षकि बठकीत सादर करण्यात आला. त्यानुसार किमान छातीत दुखणे असलेल्या किमान अठरा हजार रुग्णांना त्यात सामावून घेण्यात आले होते. या रुग्णांना स्टॅटिन व स्टॅटिनचे नवे मिश्रण देण्यात आले असता, नवे मिश्रण एलडीएल कमी करण्यास जास्त प्रभावी दिसून आले आहे. दोन्ही औषधांनी एलडीएल कमी झाले. जे लोक सिमाव्हॅस्टॅटिन घेत होते त्यांच्यात एलडीएल ६९ झाले. जे लोक (स्टॅटिनचे नवे मिश्रण)इझेटिमाइब घेत होते किंवा झेटिया घेत होते त्यांच्यात एलडीएल ५४ इतके खाली आले. आतापर्यंत कुणीही एलडीएल सत्तरच्या खाली गेल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो याचा विचार केलेला नाही पण ड्युकचे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. रॉबर्ट कॅलिफ यांच्या मते एलडीएल खूप कमी झाले तर त्याचेही वाईट परिणाम होतात. स्टॅटिन औषधांमुळे एलडीएल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. इझेटिमाइबमुळे एलडीएल पोटात शोषले जाण्याचे प्रमाण कमी होते. त्यात व्हायटोरिन या नवीन स्टॅटिन
मिश्रणामुळे हृदयविकार, बायपास शस्त्रक्रिया, स्टेन्ट लावणे हे प्रकार ६.४ टक्क्यांनी कमी झाले आहेत. ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. ख्रिस्तोफर कॅनन यांच्या मते १०० पकी दोन जणांना स्टॅटिनचे मिश्रण असलेल्या नवीन औषधांचा चांगला फायदा झाला आहे. इझेटिमाइब या औषधामुळे कर्करोगही होत नाही व स्नायूदुखी, डोकेदुखी होत नाही असा त्यांचा दावा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New option for statin medications
First published on: 22-11-2014 at 01:31 IST