सह्य़ाद्रीच्या कुटुंबकबिल्यात अनेक गिरीपर्वतांचा खेळ मांडलेला आहे. उत्तुंग शिखरे, कातळ कडे, अभेद्य सुळके यांच्या या पसाऱ्यातच अनेक गडकोट वसलेले आहेत. सर्वागसुंदर भंडारदऱ्याच्या परिसरातील मदनगड यातलाच एक, अभेद्य. या गडावर जाण्यासाठी ही अशीच बिकट वाट चढावी लागते. उभे कडे, खोल दऱ्या आणि पाऊल ठेवण्यासाठीही जागा नाही.. मदनगडाची ही वाट जणू मृत्यूचे भय दाखवत असते.