नाशिक जिल्ह्य़ातील सातमाळा रांग म्हणजे किल्ल्यांचा जणू हारच! सह्य़ाद्रीच्या उंच सखल गिरीशिखरांचे सौंदर्य घेतलेल्या या उपरांगेवर हातगड, अचला, अहिवंत, सप्तशंृग, मरकडय़ा, रवळय़ा-जवळय़ा, कण्हेरगड असे पंधराहून अधिक गडकोट दडलेले आहेत.