मोराची चिंचोलीची सहल
‘निसर्ग टुर्स’तर्फे येत्या २२, २३ फेब्रुवारी दरम्यान पुणे जिल्हय़ातील मोराची चिंचोली, निघोज येथे निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. मोराची चिंचोली हे एक निसर्गरम्य असे स्थळ आहे. या गावात शेकडो झाडे आणि मुक्तपणे हिंडणारे मोर आढळतात. निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रात प्रसिद्ध रांजणखळगे पाहण्यास मिळतात. निसर्गातील हे दोन्ही आविष्कार पाहण्यासाठी या सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
पक्षी निरीक्षण
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या २२ ते २३ फेब्रुवारी दरम्यान भिगवण येथे पक्षी निरीक्षण सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
नाणेघाट मोहीम
‘हाय टेक अ‍ॅडव्हेंचर’तर्फे येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी नाणेघाट परिसरात पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी तुषार मोडक (९८९२२२५६१५) यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा जंगल सफारी
१८ ते २० एप्रिलदरम्यान ताडोबा अभयारण्यामध्ये जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबाचे जंगल वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. वाघाबरोबरच येथे बिबळ्या, मगर, अस्वल, रानकुत्रे, हरिण, सांबर असे खूप वन्यप्राणी दिसतात. तसेच स्वर्गीय नर्तक, नीलपंख, गरुड, घुबड असे स्थानिक आणि विविध स्थलांतरित पक्षी बघण्याची संधीही या सफारीमध्ये मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क अर्चिस सहस्रबुद्धे ९८९२१७२४६७ किंवा पराग जोशी ९८३३५२४२४८. संकेतस्थळ http://www.twineoutdoors.com  
मोलेम जंगल सफारी
‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या ४ ते ८ एप्रिल रोजी गोव्याच्या मोलेमच्या जंगलास भेट दिली जाणार आहे. या अभ्यास दौऱ्यात सोबत वन्यजीव अभ्यासक असणार आहेत. तरी इच्छुकांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी विशाल शेटे (९८२०२८४३९१) यांच्याशी संपर्क साधावा.
हरिश्चंद्रगड पदभ्रमण
‘एसपीआर हायकर्स’तर्फे येत्या १६ फेब्रुवारी रोजी हरिश्चंद्रगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) राजेंद्र (८६९१८३७८३३) यांच्याशी संपर्क साधावा.