‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेक
‘एव्हरेस्ट बेस कॅम्प – चो ला पास-गोकयो ’ हा जगातील सर्व भटक्यांचे स्वप्न असलेला ट्रेक. एव्हरेस्ट चढता नाही आले, तरी आयुष्यात एकदा तरी या सर्वोच्च शिखराचे दर्शन घडावे ही तमाम गिरिप्रेमींची इच्छा असते. ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकमध्ये ही इच्छा पूर्ण होते. तसेच या ट्रेकमधून या सर्वोच्च शिखराच्या सान्निध्यात पदभ्रमंतीचा आनंदही मिळतो. एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंत जाणाऱ्या या पदभ्रमण मोहिमेत विविध हिमशिखरांचे दर्शन घडते. हिमालयाची जवळून अनुभूती, उंचीवरील पदभ्रमण मोहिमेचा अनुभव गाठीशी येतो. या पदभ्रमणामध्येच जगप्रसिद्ध सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाचेही दर्शन घडते. अशा या ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ ट्रेकचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २५ एप्रिल ते १६ मे २०१६ दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा सफारी

‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे ८ ते १० जानेवारी २०१६ दरम्यान ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
Email – abhijit.belhekar@expressindia.com

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek diary
First published on: 12-11-2015 at 03:34 IST