पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभ्या खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २१ आणि २२ सप्टेंबरदरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९५७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
आंबोली वर्षां सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या ९ ते ११ ऑगस्टदरम्यान आंबोली, सावंतवाडी, पन्हाळा आणि कोल्हापूर अशा वर्षां सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
मढेघाट भ्रमण
‘आनंद सहल’ तर्फे येत्या ४ ऑगस्ट रोजी मढेघाट, गुंजवणे धरण आणि बनेश्वर परिसरात वर्षांभ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी शैलजा बोकील (९८८११६५७७४) यांच्याशी संपर्क साधावा.
बांधवगड जंगल सफारी
ट्विन आऊटडोअरतर्फे दिवाळीच्या सुट्टीमध्ये ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत मध्य प्रदेश येथील उमरिया जिल्ह्य़ात बांधवगड येथे जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. बांधवगड जंगल हे वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच बिबटय़ा, हरिण, अस्वल, रानकुत्रे आदी प्राणी तसेच विविध पक्षी या जंगल सफारीत पाहण्यास मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क आर्चिस सहस्रबुद्धे ९८९२१७२४६७, कपिल रानडे ९४२१६२०९६५
‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव लिहूनही आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.