साल्हेर, महाराष्ट्रातील गडकोटांमधील सर्वात उंच दुर्गशिखर. उंची ५१४० फूट. छत्रपती शिवरायांनी बागलाण मोहिमेंतर्गत ५ जानेवारी १६७१ रोजी हा किल्लाजिंकून घेतला. या दिवसाचे महत्त्व जाणून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने
साल्हेर किल्ल्यावर नुकताच विजयदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने गडावर साफसफाई करण्यात आली. मंदिरे, स्मृतिस्थळांची सफाई करण्यात आली. अवशेषांभोवती वाढलेली झुडपे काढण्यात आली. तट-बुरुज-दरवाजांना फुलांची तोरणे बांधण्यात आली. भगव्या पताका लावण्यात आल्या. या उपक्रमात अनेक दुर्गप्रेमी सहभागी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory day celebrated on salher hill
First published on: 22-01-2015 at 01:54 IST