News Flash

Viral: शौचालयात बिबट्यासोबत अडकला कुत्रा; पुढे काय झालं ते एकदा बघाच

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

एकाच शौचालयात बिबट्या आणि कुत्रा अडकला असेल तर काय होईल? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर यावर तुमचं उत्तर ठरलेलं असेल. बिबट्या कुत्र्याची शिकार करुन त्याच्यावर ताव मारणार असंच तुम्ही सांगाल. पण जर कोणी तुम्हाला बिबट्या असं काहीच न करता फक्त शांत बसून राहील असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना…पण अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये कित्येक तास कुत्रा बिबट्यासोबत शौचालयात अडकलेला असतानाही जिवंत बाहेर पडला.

भारतीय वनखात्याचे अधिकारी परवीन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये बिबट्या आणि कुत्रा एकाच शौचालयात काही अंतरावर बसलेले दिसत आहेत. कर्नाटकमधील एका गावात ही घटना घडली आहे.

झालं असं की, बिबट्यापासून वाचण्यासाठी कुत्रा पळत शौचालयात शिरला. मात्र यावेळी बिबट्यादेखील त्याच्या मागे शौचालयात शिरला. बिबट्या आयता तावडीत सापडल्याने लोकांनीही लगेच शौचालयाचा दरवाजा बंद करुन घेतला.

परवीन यांनी शेअर केलेल्या फोटोत बिबट्याला घाबरलेला कुत्रा एका कोपऱ्यात शांत बसलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, “शौचालयात कित्येत तासांसाठी अडकलेला हा कुत्रा जिवंत बाहेर पडला. हे फक्त भारतातच होतं”.

परवीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना एका घरातील शौचालयात शिरला. यानंतर घरातील लोकांनी बाहेरुन दरवाजा लावून घेतला. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कबाडा गावात हा प्रकार घडला आहे”. नंतर वनविभागाने दोघांचीही सुटका केली. परवीन यांचं ट्विट व्हायरल झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 2:58 pm

Web Title: a dog and a leopard stuck in toilet for hours in karnataka sgy 87
Next Stories
1 ‘सबका साथ सबका विकास योजने’अंतर्गत मोदी सरकार प्रत्येकाला देणार एक लाख?; जाणून घ्या काय म्हणालं सरकार
2 कौतुकास्पद! …म्हणून ‘हा’ भारतीय उद्योजक कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही देणार पगार
3 टिकैत-राऊत भेट म्हणजे ‘ट्रॅक्टर, JCB चा सूर एक झाला’; फोटो शेअर करत खोचक टोला
Just Now!
X