News Flash

‘नमो अ‍ॅप’चं अधिक माहितीसह अपडेटेड व्हर्जन दाखल

पंतप्रधान मोदींच्या जन्मदिवसाच्या एक दिवस अगोदरच वापरकर्त्यांना भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिवसाच्या एक दिवस अगोदर सोमवारी ‘नमो’ अ‍ॅपचे नवे व्हर्जन सादर करण्यात आले आहे. नव्या व्हर्जनद्वारे या अ‍ॅपमध्ये आणखी काही फीचर्स जोडण्यात आलेले आहेत. पंतप्रधान मोदींचा उद्या (मंगळवार) ६९ वा जन्मदिवस आहे. वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यादृष्टीने या अ‍ॅपचे नवे व्हर्जन आणल्या गेले आहे.

पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती देताना म्हटले आहे की, नमो अ‍ॅपला नवे अपडेट! हे आता पुर्वीपेक्षा अधिक जलद आणि सोपे आहे. सोप्या पद्धतीने विशेष मजकूर आपण मिळवू शकतो. आपल्या चर्चेला अधिक चांगली बनवण्यासाठी, नव्या व्हर्जनचा स्वीकार करूयात.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर हे अ‍ॅप पहिल्यांदा अपडेट करण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या राजकीय वाटचालीबाबतची माहिती मल्टिमीडिया व्हर्जनमध्ये दिसेल. शिवाय भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाची छायाचित्रं देखील पाहायला मिळतील. अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये वन-टच नेव्हिगेशन, ‘नमो एक्‍सक्‍लुझिव्ह’ या नव्या सेक्शनसह वापरकर्त्यांच्या आवडीनुसार मजकूराचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

विविध भागांमधील मजकूर पाहण्यासाठी आता वापरकर्त्यांना केवळ एकदाच स्लाईड फिरवावी लागणार आहे. आतापर्यंत हे अ‍ॅप दीड कोटींपेक्षा अधिक जणांनी डाउनलोड केलेले आहे. यामध्ये भाजपा सरकारद्वारे करण्यात आलेल्या कामांना दर्शवण्यासाठी इंफोग्राफिक्‍स देखील आहेत. शिवाय नमो मर्चेंडाइज व माइक्रो-डोनेशन सारखे विभागही आहेत. या अ‍ॅपद्वारे वापरकरकर्त्यास थेट पंतप्रधान मोदींकडूनही मेसेज येऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 7:06 pm

Web Title: a new version of namo app has been launched msr 87
Next Stories
1 Video: या मांजरींच्या कॅटवॉकसमोर मॉडेलसुद्धा पडतील फिक्या
2 हा आहे फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम स्मार्टफोन?; आनंद महिंद्रांचे ट्विट व्हायरल
3 हे ठाऊक आहे? पंतप्रधान मोदींनी किशोरवयात नाटक लिहून त्यात केला होता अभिनय!