जगभरातील काही तरुणांचे आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्याचं प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती गेल्या वर्षभरापासून प्रसिद्ध होत आहे. आता टेक्सासमधल्या एका तरुणानं आयसिस या दहशवादी संघटनेकडे नोकरीसाठी अर्ज केला आहे. या तरुणाला आयसिसच्या दशतवाद्यांना इंग्रजीचे धडे द्यायचे आहेत आणि यासाठी आपण उत्तम व्यक्ती असल्याचं त्यानं आपल्या अर्जात म्हटलं आहे. हा अर्ज आणि काही पत्र मोसूलमधल्या एका घरात नुकतीच सापडली असून ती ‘जॉर्ज वॉशिंग्टन स्टडी’ च्या हाती लागली आहेत.

आरटीच्या माहितीनुसार या तरुणानं अबु मोहम्मद अल अमेरिकी नाव धारण करत ही पत्र लिहिली आहेत यात त्याने आपण जिहादी असल्याचा दावा केला आहे. ‘मला आयसिसच्या दहशतवाद्यांना इंग्रजी शिकवायचे आहे. इंग्रजी शिक्षकाच्या पदासाठी मी अर्ज करत आहे.’ असं त्यानं पत्रात लिहलं आहे. जॉर्ज वॉशिंग्टन स्टडीनं हे पत्र समोर आणलं आहे. मोसूलमधल्या एका घरात हे पत्र सापडलं होतं. या तरुणाचं मुळ नाव अद्यापही समजू शकलं नाही. पण, हा व्यक्ती जिवंत असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकन वृत्तपत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत ६४ अमेरिकन नागरिक आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाले आहेत. हे जिहादी सिरिया किंवा इराकमध्ये आससिसच्या दहशतवादी गटात सामील झाले असल्याचं समोर आलं आहे. तर गेल्या काही वर्षांत गुप्तचर यंत्रणांनी ५० हून अधिक तरुणांना या संघटनेत सहभाही होण्यापासून रोखलं आहे.

जॉर्ज वॉशिंग्टन स्टडीनं अमेरिका सोडून आससिसमध्ये सामील झालेल्या जिहाद्यांवर महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली आहे. यावेळी त्यांना टेक्सासमधल्या तरुणाचं पत्र मोसूलमधल्या घरात सापडलं. इंग्रजी शिकवण्याच्या बाहाण्यानं त्यानं दहशतवादी संघटनेत प्रवेश केला असल्याचं म्हटलं जात आहे.