केरळमधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. स्कुटीवरुन प्रवास करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडत असून महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं कारण वाचून तुम्हीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडीओत महिला स्कुटी चालवताना दिसत असून रस्त्यावर एकाच जागी गाडी घेऊन थांबलेली दिसत आहे. चुकीच्या दिशेने येणाऱ्या बसचालकाला रोखण्यासाठी महिला रस्त्यावरच थांबलेली दिसत असून, जोपर्यंत चालक योग्य लेनमध्ये जात नाही तोपर्यंत महिला आपली स्कुटी हलवत नाही.

महत्त्वाचं म्हणजे यावेळी रस्त्यावर उभे इतर लोक हे दृश्य फक्त पाहत उभे होते. पण महिलेने कोणाचीही सोबत किवा मदत मिळावी याची वाट पाहिली नाही. इतक्या मोठ्या बससमोर स्कुटीवर असणाऱी महिला अगदी हिंमतीन उभी राहिलेली पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ट्विटरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी आपण योग्य असतो तेव्हा ठाम राहणं गरजेचं असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.