जगातील आघाडीची इलक्ट्रिक वाहन कंपनी Tesla चे सीईओ एलन मस्क सध्या बरेच चर्चेत आहेत. कधी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून तर कधी त्यांच्या कंपनीच्या शेअर्सने घेतलेल्या उसळीमुळे मस्क यांच्याबाबतच्या बातम्या येत असतात. मस्क यांची लोकप्रियता इतकी वाढलीये की त्यांनी नुसतं एक ट्विट केलं तरी छोट्या-मोठ्या कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढतायेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलन मस्क यांनी मंगळवारी ‘I kinda love Etsy’ हे ट्विट केलं. त्याच्या या ट्विटनंतर लगेचच Etsy कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची उसळी बघायला मिळाली. मस्क यांनी एकापाठोपाठ एक दोन ट्विट केले. पहिल्या ट्विटमध्ये ‘I kinda love Etsy’ असं त्यांनी म्हटलं. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी “Etsy वरुन माझ्या पाळीव कुत्र्यासाठी हाताने विणलेले लोकरापासून बनवलेले मार्विन द मार्टियन हेल्म विकत घेतले” असं म्हटलं. मस्क यांच्या या ट्विटनंतर Etsy ची अक्षरशः लॉटरी लागली. शेअर मार्केट सुरू होताच कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची तेजी आली. कंपनीसाठी गेल्या 12 महिन्यांतील ही सर्वात मोठी वाढ होती. Etsy एक ई-कॉमर्स वेबसाइट असून त्यावर हँडमेड प्रोडक्ट्स मिळतात.

Signal साठी ट्विट केल्यानंतर भलत्याच कंपनीचे शेअर्स वाढले होते :
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन वादंग झाल्यानंतर मस्क यांनी सोशल मेसेजिंग अ‍ॅप सिग्नलबाबत Use Signal असं ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर सिग्नल वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली पण शेअर्सच्या बाबतील सिग्नल नावाच्या भलत्याच कंपनीला मोठा फायदा झाला होता. सिग्नल या नावाच्या साम्यामुळे गुंतवणूकदारांचा गोंधळ उडाला आणि सिग्नल अ‍ॅडव्हान्स इंक नावाच्या टेक्सास राज्यातील छोट्या कंपनीचे शेअर्सनी मोठी उसळी घेतली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After elon musks tweet etsy soars the stock market is at peak dumb sas
First published on: 27-01-2021 at 10:16 IST