भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसाचा व्यत्यय आल्याने थांबवण्यात आला. मँचेस्टरच्या मैदानात पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सुरु झालेल्या या सामन्यातील उर्वरित खेळ हा राखीव दिवशी म्हणजेच आज (बुधवारी) खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यातील ४६.१ षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. यानंतर सुमारे ४ तास पाऊस थांबेल याची वाट पाहिली गेली. दरम्यान अनेकदा डकवर्थ-लुइस नियमानुसार भारताला नवीन लक्ष्य देण्यात येणार असल्याच्या चर्चा व्हॉट्सअप, ट्विटरपासून वृत्तवाहिन्यांवरही सुरु झाल्या. याचवेळी पाऊस थांबला आणि पंच आणि सामनाधिकारी यांनी खेळपट्टीची पाहणीही केली, मात्र पुन्हा पाऊस सुरु झाला आणि तो बराच काळ सुरु राहिल्याने खेळ थांबवून राखीव दिवशी खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये अचानक पाऊस आल्याने संतापलेल्या नेटकऱ्यांनी सामना पावसामुळे थांबला असला तरी नेटकऱ्यांनी मात्र डकवर्थ लुइस आणि पावसासंदर्भातील मिम्सचा पाऊस पाडला.

ये कौनसा अस्त्र है?

याचं गणितचं वेगळं

भारताला नवीन लक्ष्य दिल्यास

उडवून लावू

डकवर्थ लुईस पद्धत विज्ञानापलिकडची आहे

भारतीय चाहते डकवर्थ आणि लुईस भाईंची वाट पाहताना

नवीन लक्ष्याची आकडेमोड करताना

हेच ते दोघे

डकवर्थ लुईस भारतीय संघाकडे पाहताना

डकवर्थ लुईस पद्धत समजून घेताना

असं करणार

तर इतके कमवले असते

इथे पहिल्या क्रमांकावर

पैसे आहेत का?

एवढचं सांगा कसं?

इकडे पण वापरा

जर डवर्थ लुइस नियम लावता तर

असं आहे गणित

एवढं नको सांगूस

घ्या समजून

चर्चा डकवर्थ लुइसवर

सगळेच डकवर्थ लुइस समजून घेताना

डकवर्थ लुइस नियम तयार करतानाचा फोटो

दरम्यान, आजच्या राखीव दिवशी मँचेस्टरमध्ये पावसाची तुरळक शक्यता आहे. आज पाऊस पडला नाही तर संपूर्ण ५० षटकांचा समाना खेळवला जाईल आणि अंतिम फेरीत कोणता संघ जाणार यावर शिक्कामोर्तब होईल.