ऑस्ट्रेलियातील ७३ वर्षीय कलाकार माईक पर हे तीन दिवस रस्त्याखाली असणाऱ्या चेंबरमध्ये राहिले. अखेर तीन दिवसांनंतर त्यांना या चेंबरमधून बाहेर काढण्यात आलं आहे. तीन दिवस ऑक्सिजन, पाणी. चित्र काढण्यासाठी पेन्सिल आणि वही इतकंच साहित्य त्यांना पुरवण्यात आलं होतं.

रस्त्याखाली ते ज्या चेंबरमध्ये होते त्याच रस्त्यावरून वाहतूकही सुरू होती. अखेर रविवारी त्यांना या चेंबरमधून बाहेर काढण्यात आलं. शेकडो वर्षांपूर्वी टास्मानिया येथे झालेल्या आदिवासींवरील अत्याचाराविषयी लोकांना कळावं यासाठी त्यांनी स्वत:ला ७२ तासांहून अधिक वेळ चेंबरमध्ये बंद करून ठेवलं होतं. ‘एखाद्या पक्ष्याला आपण कित्येक वर्षे लहान पिंजऱ्यात कैद करून ठेवतो या पक्ष्याचं  आयुष्य कसं असेल याची कल्पना करा, माईक यांनी या गोष्टींचा अनुभव घेतला आहे, त्यामुळे तीन दिवस बंद खोलीत राहून कसं वाटतं हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक असल्याची प्रतिक्रिया एकानं दिली आहे.

माईक यांना तीन दिवसांत फक्त ऑक्सिजन आणि पाणी पुरवण्यात आलं होतं. यापूर्वीही माईक यांनी अशा प्रकारे स्टंट केले आहेत. अनेकवेळा याच स्टंटमुळे ते वादात सापडले असल्याचंही म्हटलं जात आहे.