19 September 2020

News Flash

Video: तुमच्या नशिबात फक्त अभिनंदन यांचा उष्टा कप, भारताचा पाकिस्तानला टोला

विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये १६ तारखेला ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे.

विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये १६ तारखेला ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे चाहतेही या सामन्याची तेवढ्याच अतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषकाला सुरूवात झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील चाहत्यानं सोशल मीडियावर मिम्स, व्हिडीओ आणि जाहिरातींचा सपाटा लावला होता.

जून महिन्यातील तिसरा रविवार म्हणजे फादर्स डे आणि याच दिवशी भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहे. याचे औचित्य साधत ‘फादर्स डे’ ही थीम घेऊन काही जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. त्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानी चाहत्याने कमांडर अभिनंदन आणि विश्वचषकाची सांगड घालत जाहिरात तयार केली होती. त्या जाहिरातीमुळे भारतीय चाहत्यांची मनं दुखावली गेली होती. आता त्या जाहिरातीला भारतीयांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

उद्योगपती हर्श गोयंका यांनी ही जाहिरात ट्विट केली आहे. अनेक चाहत्यांकडून ती जाहीरात ट्विट करण्यात आली आहे. या जाहिरातीनंतर पाकिस्तानच्या चाहत्यांची बोलती बंद झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडिआवर येत आहेत. रविवारी होणाऱ्या भारत-पाक सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

दरम्यान, भारत पाकिस्तानमध्ये रविवारी मँचेस्टरमध्ये सामना अपेक्षित असला तरी पावसामध्ये सामना वाहून जाण्याची शक्यता आहे. जर हा सामना झाला नाही तर क्रीडारसिकांची निराशा होईल. भारत पाकिस्तान संघांमधला सामना हा नेहमीच पॉइंट टेबलचा विचार न करणारा नी ते युद्ध अनुभवायला मिळावं असाच असतो, त्यामुळे हा सामना व्हायलाच हवा असंच सगळ्यांना वाटत असेल यात काही शंका नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 9:22 am

Web Title: awesome reply by india indvspak world cup 2019 india pakistan advertisement war fathers day abhinandan nck 90
टॅग Fathers Day
Next Stories
1 Father’s Day 2019 : ‘बाप से बेटा सवाई’; … तर युवराज क्रिकेट खेळताना दिसलाच नसता
2 Father’s Day 2019 : वडिलांना द्या ‘हे’ भन्नाट गिफ्ट, कधीही विसरणार नाहीत
3 १८ हजार फुटांवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांचा योगा
Just Now!
X