News Flash

‘या’ नेलपेंटच्या किमतीत एक आलिशान कार येईल

किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

‘या’ नेलपेंटच्या किमतीत एक आलिशान कार येईल
या नेलपेंटची किंमत ही भारतीय मुल्याप्रमाणे १ कोटी ५८ लाखांच्या घरात आहे.

लॉस एन्जेलिसमधल्या लक्झरी ज्वेलरी ब्रँडनं जगातील सर्वात महागडी नेलपेंट बाजारात आणली आहे. या नेलपेंटची किंमत इतकी अधिक आहे की या किमतीत एखादी आलिशान कार किंवा घरदेखील विकत येऊ शकते. आता या नेलपेंटमध्ये इतके काय आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तेव्हा तुमची उत्सुकता फार न ताणता या महागड्या नेलपेंटमध्ये इतकं विशेष काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो. या नेलपेंटमध्ये हजारो किमतीचे मौल्यवान हिरे आहेत आणि याचमुळे या नेलपेंटची किंमत ही भारतीय मुल्याप्रमाणे १ कोटी ५८ लाखांच्या घरात आहेत.

‘अॅझाच्युअर’ या ब्रँडनं ही नेलपेंट तयार केली आहे. हा ब्रँड ‘ब्लॅक डायमंड किंग’ म्हणूनही ओळखला जातो. अॅझाच्युअर ब्रँडच्या प्रत्येक बाटलीमध्ये २६७ कॅरेट्स काळे हिरे आहेत, म्हणूनच या नेलपेंटची किंमत ही सर्वाधिक असल्याचं बोललं जातं आहे. इतकंच नाही तर या ब्रँडनं ०.५ मिली ची नेलपेंटदेखील बाजारात आणली आहे, याची किंमत तुलनेनं कमी आहे कारण यात फक्त एकाच हिऱ्याचा वापर केला आहे असं या ब्रँडचं म्हणणं आहे. याची किंमत १६०० रुपयांच्या आसपास आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 10:13 am

Web Title: azature has released a set of nail polishes infused with 267 carats of black diamond
Next Stories
1 Yabba dabba doo! गर्भश्रीमंत सुलतानाला वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली ‘फ्लिंटस्टोन कार’
2 धक्कादायक – जलिकट्टूच्या विजेत्याला बैलाची मालकीण मिळणार बक्षीस
3 Viral Video : अमेरिकन सिनेटरचा ‘अदृश्य चष्मा’ होतोय व्हायरल
Just Now!
X