News Flash

मुलीने मुस्लीम मुलाला लग्नासाठी दिला होकार; बिल गेट्स यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जाणून घ्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या गेट्स यांचा जावई कोण आहे

Bill Gates comments daughters engagement post

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले विंडोजचे संस्थापक बिल गेट्स यांच्या मुलीने नुकतीच लग्नाची बातमी जगजाहीर केली. बिल यांची थोरली मुलगी जेनिफर गेट्सला तिचा प्रियकार नायल नस्सारने प्रपोज केलं. जेनिफरने त्याला लग्नासाठी होकार दिला. आपल्या २३ वर्षीय मुलीच्या या निर्णयावर बिल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जेनिफरने काय पोस्ट केलं?

नायलने आपल्याला मागणी घातल्याचे आणि आपण त्याला होकार दिल्याची माहिती जेनिफरने इन्स्ताग्रमावर फोटो पोस्ट करत दिली आहे. “नायल नस्सार, तु तुझ्यासारखा केवळ तूच आहेस. तू मला अगदी सुखद धक्का दिला आहेस. पुढील आयुष्य तुझ्याबरोबर घालवण्यासाठी मी उत्सुक आहे,” अशी पोस्ट जेनिफरने केली आहे.


क्लिक करुन पाहा  >> जेनिफर आणि नायलचे खास फोटो

नायलनेही केली पोस्ट अन् म्हणाला…

नायलनेच जेनिफर हो म्हटल्याचे इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत सांगितलं आहे. “तिनं हो म्हटलं. आता मी जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती असल्याचे मला वाटत आहे,” असं नस्सारने जेनिफरने होकार दिल्याची पोस्ट करताना म्हटलं आहे.


कशी झाली भेट?

पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या घोड्यांच्या शर्यतीवेळी २०१६ मध्ये पहिल्यांदा जेनिफर आणि नायल यांची ओळख झाली होती. या दोघांनाही घोडेस्वारीची प्रचंड आवड आहे. घोडेस्वारीची आवड असल्यानेच जेनिफर आणि नायल दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. गेल्या चार वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

नायल नस्सार आहे तरी कोण?

जेनिफरला लग्नसाठी मागणी घालणारा नायल नस्सार २९ वर्षांचा आहे. जेनिफरप्रमाणेच नायलसुद्धा गर्भश्रीमंत आहे. त्याच्या पालकांची गल्फमध्ये मोठी आर्कीटेक्चर फर्म आहे. नायल मुळचा इजिप्तचा असून तो मुस्लीम आहे. त्याचे बालपण कुवैतमध्येच गेलं आहे. २००९ साली नायल उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेला. तेथे त्याने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतलं. २०१३ साली नायलने मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. नायलला घोडेस्वारीची प्रचंड आवड आहे. तो वयाच्या पाचव्या वर्षापासून घोडेस्वारी करतो. त्याने आपल्या देशासाठी घोडेस्वारीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

बिल गेट्स काय म्हणाले?

जेनिफर आणि नायलने एकमेकांसोबत लग्न करत असल्याचं जाहीर केल्यानंतर बिल यांनीही याबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जेनिफरच्या इन्स्ताग्राम पोस्टवर बिल यांनी कमेंट केली आहे. “मी याबद्दल (लग्नाबद्दल) प्रचंड उत्सुक आहे. अभिनंदन जेनिफर आणि नायल,” असं बिल यांनी आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. बिल यांना जेनेफर आणि नायलच्या नात्याबद्दल कल्पना असल्याचे बोलले जात आहे.

लग्न कधी?

जेनिफर सध्या न्यू यॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. जेनिफर आणि नायल लग्न कधी करणार आहेत याबद्दलची कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. मात्र लग्नानंतर नायल आणि जेनिफर न्यू यॉर्कमध्येच राहणार असल्याचे समजते. नायल २०२० ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये इजिप्तच्या संघाकडून घोडेस्वारी प्रकारात सहभागी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 11:31 am

Web Title: bill gates comments on his daughter jennifer gates engagement to egyptian athlete nayel nassar scsg 91
Next Stories
1 Coronavirus च्या विळख्यातही त्या दोघांचं ‘कहो ना प्यार है!’
2 कौतुकास्पद! ई-कचऱ्यापासून २२ वर्षीय भारतीय तरुणाने बनवले ६०० ड्रोन
3 Video: लुंगी, चप्पल घालूनच मंत्री महोदय बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरले अन्…
Just Now!
X