23 November 2017

News Flash

Viral Video : अमेरिकन टीव्ही रिअॅलिटी शोमधील ‘तो’ बॉलिवूड डान्स हीट

कोरिओग्राफीबाबत नापसंती

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 12, 2017 6:29 PM

अमेरिकेतील टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये डान्स सादर करताना कपल

टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये जोडप्याने बॉलिवूडमधील एखाद्या गाण्यावर डान्स कऱणे फारसे विशेष नाही. सध्या विविध चॅनलवर अनेक रिअॅलिटी शो सुरु असून यामध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे दिसते. मात्र, सध्या अमेरिकेतील एका रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडमधील गाण्यावर सादरीकरण करणाऱ्या जोडप्यावर बरीच चर्चा रंगलेली दिसत आहे. ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील ‘गल्ला गुडीया’ या गाण्यावर या जोडप्याने डान्स केला.

त्यांच्या या सादरीकरणावर अनेकांनी उलटसुलट चर्चा केली. अनेकांना हा डान्स आवडला असून त्यांनी पुन्हा-पुन्हा तो पाहिला तर काहींनी त्यावर नकारात्मक प्रतिक्रियाही नोंदवल्या. हा डान्स नकुल देव महाजन यांनी कोरिओग्राफ केला असून हॉलिवूडमध्ये बॉलिवूडच्या सादरीकरणासाठी मी प्रसिद्ध आहे असे तो मानतो. मात्र, हा डान्स प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. पण दुसरीकडे कायली मिलीस आणि कीकी नेमचेक यांनी अतिशय उत्तम सादरीकरण केल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. कायलीने यामध्ये पारंपरिक लेहंगा-चोली घातली होती. तर कीकीने एम्ब्रॉडरी केलेले जॅकेट आणि पँट घातली होती.

‘बाटा’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

या डान्समध्ये ठुमका आणि भांगड्याच्या काही स्टेप्स बसविण्यात आल्या होत्या. फेसबुकवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अवघ्या ७ तासांमध्ये ते १ लाख ७० हजारांहून अधिक जणांनी पाहिला, तर ५०० जणांनी तो शेअर केला. त्यामुळे अतिशय कमी वेळात हा डान्स खूप चर्चेचा विषय ठरला.

First Published on September 12, 2017 6:27 pm

Web Title: bollywood dance in america tv reality show viral on internet