भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह असतो. प्रत्येक सामन्यानंतर चहल, आपल्या Chahal tv या शो च्या माध्यमातून अनेक खेळाडूंच्या मुलाखती घेतो. त्याच्या या कार्यक्रमाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसादही मिळतो. महिला क्रिकेटपटू डॅनिअल वॅट आणि चहल या दोघांमध्ये नेहमी मजेशीर संभाषण सुरु असतं. अशाच एका पोस्टवर वॅटने चहलची फिरकी घेतली आहे.
चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांच्यासोबत एक फोटो टाकला. या फोटोवर चहलने आपल्या चाहत्यांना, योग्य कॅप्शन द्या अशी विनंती केली.
चहलच्या या फोटोवर डॅनिअल वॅटने दिलेलं उत्तर हे तितकचं मजेशीर होतं.
दरम्यान सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने सर्व महत्वाच्या स्पर्धा तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. सर्व खेळाडू सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासकीय यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2020 3:32 pm