News Flash

VIDEO : या धाडसी मुलीने वाचवले कर्मचा-यांचे प्राण

चोरांनी कु-हाडीने केले अनेकांवर वार

आपल्या प्राणाची पर्वा न करता तिने अत्यंत धिटाईने साराने चोरांचा समाना केला.

सहा वर्षांची सारा पटेल सध्या सोशल मिडियावर खुप गाजते. कारण या मुलीच्या धाडसीपणामुळे जगभर तिचे कौतुक होत आहे. सारा ही भारतीय असून तिचे कुटुंब न्यूझीलँडमध्ये स्थायिक आहे. तिच्या वडिलांच्या दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने काही चोर घुसले. या चोरांच्या हातात कु-हाड आणि इतर धारधार शस्त्रे होती. या चोरांनी दुकानातल्या काही लोकांवर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.
एका माणसावर कु-हाडीने वार करत असताना साराने ते करण्यापासून त्यांना रोखले. तिचा हा धाडसीपणा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ऑकलंडमधल्या एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात सोमवारी हा प्रकार घडला. हे चोर धार धार शस्त्रांने कर्मचा-यांवर हल्ला करत होते. अशा वेळी घाबरून न जाता सारा एका एका चोराचे पाय खेचत होती,  त्यांना तसे न करण्यापासून दटावत होते. चोर यावेळी तिलाही जखम करु शकत होते पण आपल्या प्राणाची पर्वा न करता तिने अत्यंत धिटाईने या चोरांचा समाना केला. एक चोर तर कर्मचा-याच्या डोक्यावर कु-हाडीने वार करत होता पण साराने त्याचे पाय पकडून त्याला मागे ओढले.   चोरांच्या हल्ल्यानंतर सारा काहीशी बिथरली आहे, पण या धक्क्यातून ती हळूहळू सावरत असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली.  आपल्याला मुलीचा खूप अभिमान वाटतो असेही त्याने सांगितले. साराच्या या धाडसीपणाचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला तिच्या या धाडसीपणाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 7:32 pm

Web Title: cctv footage of brave 6 year old indian girl trying to stop armed robbers goes viral
Next Stories
1 अॅपल ७ आला रे आला !
2 VIDEO : अननसापासून साकारले गणराय
3 ‘सुषमा स्वराज नव-याला का नाही करत फॉलो?’
Just Now!
X