साहस, रोमांच, प्रसिद्धी यांच्या शोधात कित्येक तरुण मुलं आपला जीव धोक्यात घालतात. उंचच उंच इमारती, टॉवरवर चढून सेल्फी काढतात, छताच्या टोकावर चढून कवायती करतात. हा सारा प्रकार काळजात धडकी भरवणाराच असतो. अशा डेअरडेव्हिल्सचे फॉलोअर्सही लाखोंनी असतात. स्टंटबाजीच्या नादात आपला जीव जाऊ शकतो हे सत्य माहिती असतानाही जीव धोक्यात घालण्याची जोखीम ते घेतात.

Video : हत्तीचा प्रवासी बसवर हल्ला, गाडीत अडकलेल्या चालकाची अखेर सुटका

३५ वर्षांनंतर ‘या’ देशानं उठवली चित्रपटांवरील बंदी

पण, अशी स्टंटबाजी करणं एका चिनी डेअरडेव्हिलला महागात पडलं असून यात त्याने स्वत:चा जीव गमावला आहे. रुफटॉप क्लायंबर वांग याँगनिंग असं त्याचं नाव असून, ६२ मजल्यांच्या इमारतीच्या छतावरून पडून त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी वांगचा मृतदेह सापडला. उंच इमारत किंवा त्यांच्या टॉवरवर चढून वांग वेगवेगळ्या कवायती करायचा. मोठ्या चपळाईनं छतावर चढण्याचा आणि कवायती करण्याचा चांगला अनुभव त्याच्या गाठीशी होता. पण त्यादिवशी मात्र नशीबानं त्याला साथ दिली नाही. शहरातल्या उंच इमारतीवरून पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर असे स्टंट करून आपला जीव धोक्यात न घालण्यांचं आवाहन तरुणांना करण्यात येत आहे.