जवळपास तीन दशकानंतर सौदी अरेबियानं व्यावसायिक चित्रपटांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे पुढील वर्षात सौदीमध्ये पुन्हा एकदा चित्रपटगृह सुरू होणार आहे. १९७० च्या दरम्यान कट्टरतावादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या विरोधामुळे सौदीमध्ये व्यावसायिक चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती.

Video : हत्तीचा प्रवासी बसवर हल्ला, गाडीत अडकलेल्या चालकाची अखेर सुटका

सौदी राजा मोहम्मद बिन सलमान हे देशात बदल घडवू पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वाहनं चालवण्यात महिलांवर घालण्यात आलेली बंदी उठवली होती. त्यांच्या या निर्णयाचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. आता सलमान यांनी व्यावसायिक चित्रपटावर घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीच्या सांस्कृतिक आणि माहिती मंत्रालयानं याबद्दलची माहिती दिली आहे. लवकरात लवकर सिनेमागृहांना चित्रपट दाखवण्याचे परवाने देण्यात येतील. त्यामुळे मार्च २०१८ च्या आसपास देशात सिनेमागृह सुरू होतील, असं सांस्कृतिक आणि माहिती मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. २०३० पर्यंत देशातील सिनेमागृहांची संख्या ३०० पर्यंत नेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

४०० वर्षांनंतर म्हैसूर राजघराण्याची शापातून मुक्तता, राजा यदुवीर यांना पुत्ररत्न

सिनेमांचा संस्कृतीवर विपरित परिणाम होतो, त्यामुळे सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी देशातील १९७० मध्ये कट्टरपंथीयांनी केली होती. तेव्हापासून चित्रपटांवर बंदी घातली गेली. ती आजतागयत कायम होती. या बंदीनंतर आता राजांनी जवळपास ३५ वर्षांनंतर ही बंदी उठवली आहे.