News Flash

Video: क्रिकेटपटूचा अश्लिल डान्स, पबमधील व्हिडीओ व्हायरल

तो डान्स फ्लोअरवर येतो आणि नाचू लागतो. त्यानंतर थोडाच वेळात...

व्हायरल व्हिडीओ

विंडीजचा दमदार सलामीवीर ख्रिस गेल म्हणजे गोलंदाजांचा कर्दनकाळ. तो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा गोलंदाजांना पळता भुई थोडी होते. आपल्या उत्तुंग षटकारांसाठी ओळखला जाणारा गेल हा मैदानाबरोबरच मैदानाबाहेरील गोष्टींसाठी कायम चर्चेत असतो. पुन्हा एकदा गेल चर्चेत आला आहे त्यामागील कारण आहे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले काही व्हिडिओ.

गेल हा त्याच्या खेळाबरोबरच मैदानावरील सेलिब्रेशनसाठीही ओळखला जातो. विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करणं असो किंवा सामना जिंकल्यानंतर कॅरेबियन डान्स असो गेल अनेकदा असा सेलिब्रेशनमध्येही सामीलाचा असतो. आयपीएलदरम्यानही अनेकदा गेल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबरही थिरकताना दिसला आहे. गेलला क्लबिंगची विशेष आवड आहे. असाच एका क्लबमधील व्हिडिओ त्याने पोस्ट केले आहेत. मात्र या व्हिडिओंमध्ये तो काही महिला डान्सर्सबरोबर अश्लील डान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीलच गेल डान्स फ्लोअरवर येतो. तो हळूहळू डान्स फ्लोअरवरील तरुणींबरोबर नाचू लागतो. नंतर तो त्या तरुणींबरोबर अश्लील डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसते.

अनेकांनी गेलच्या या डान्सचे कौतुक केलं आहे तर काहींनी त्याच्या या डान्स स्टेपवर नाराजी व्यक्त केल्याचे पहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 4:35 pm

Web Title: chris gayle dance video in club goes viral scsg 91
Next Stories
1 My Sudama moment with Lord Krishna; सचिनसोबतच्या फोटोला मोहम्मद कैफची भन्नाट कॅप्शन
2 श्रेयसचा षटकार पाहून विराट झाला थक्क! सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
3 Video: …अन् ३२५ अलिशान फ्लॅट्स असणाऱ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या
Just Now!
X