पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच  ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा असं आवाहन केलं आहे. करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र आलं पाहिजे. त्यामुळेच आपण सर्वांनी रविवारी रात्री नऊ वाजता घरातील सगळे लाइट्स बंद करुन घराच्या दारात किंवा बाल्कनीमध्ये एक दिवा, मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाई फ्लॅशलाइट लावावी अशा शब्दांमध्ये मोदींनी हे आवाहन केलं. मात्र यानंतर ट्विटवर लगेचच Diwali हा शब्द ट्रेण्ड होऊ लागला आहे. काही मिनिटांमध्ये या शब्दाचा समावेश असणारे हजारो ट्विट्स पडले आहेत.

अनेकांनी मोदींनी केलेल आवाहन हे अंध:कार घालवण्यासाठी आहे दिवाळी साजरी करण्यास सांगितलेलं नाही असा टोला अतिउत्साही लोकांना लगावला आहे. २२ मार्च रोजी मोदींनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी थाळीनाद करण्यास सांगितले होते त्यावेळी देशातील अनेक भागांमध्ये लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडत एकत्र येत थाळीनाद केला होता. मात्र ही चूक पुन्हा करु नका आपल्या घरामध्येच दिवे लावा असं आवाहन मोदींनी केलं आहे. अशाचप्रकारचं आवाहन अनेकांनी ट्विवटरवरुनही केलं आहे. काहींनी यावरुन मिम्सच्या माध्यमातून या आवहानावर भाष्य केलं आहे. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले ट्विट…

लक्षात ठेवा ही दिवाळी नाही…

आता ही इमेज व्हायरल होणार

तयारी

एप्रिलमध्ये दिवाळी

करोना दिवाळी

हे असं होणार नक्कीच

दिवाळी

दिवाळी दोनदा यंदा

नासा आमचे फोटो काढा हा

बाकी जग आणि आपण

ते दिवाळीसारखे फोटो पण येतील…

मी असं साजरं करणार

पण फोटो का काढायचे?

दिवाळी ट्रेण्ड होतयं

मी आणि माझे मित्र

भारतीय मुलींचे नंतर डीपी

दरम्यान यासंदर्भातील इतरही अनेक हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड होताना दिसले.