04 March 2021

News Flash

करोनामुळे विलगीकरणात रहावे लागत असल्याने त्याने शोधला वृद्ध वडिलांना भेटण्याचा अनोखा मार्ग

फोटो पाहून तुम्ही देखील भावूक व्हाल

करोना विषाणूमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता ११० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. ज्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला आहे त्यांनी स्वइच्छेने स्वत:चे विलगीकरण केलं आहे. अशा परिस्थित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक वृद्ध व्यक्तीने स्वत:ला घराच्या एका खोलीमध्ये कोंडून घेतले आहे. त्या वृद्ध व्यक्तीचा मुलगा जेव्हा त्यांना भेटायला येतो तेव्हा तो खोली बाहेर उभा राहतो आणि त्यांच्याशी फोनद्वारे गप्पा मारतो. बाप-लेकांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Sandy Hamilton नावाच्या व्यक्तीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्या व्यक्तीने या वृद्ध व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला आहे आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांचा मुलगा रोज येथे येतो असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 7:07 pm

Web Title: coronavirus this is how father son talk while lockdown avb 95
Next Stories
1 शाओमीकडून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न, युजरला Free मध्ये नवीन स्मार्टफोन आणि बॅग
2 युजवेंद्र चहलच्या फोटोवर डॅनिअल वॅटची भन्नाट कॅप्शन, तुम्हीही हसाल !
3 अखेरचे दोन दिवस शिल्लक, ‘या’ दमदार स्मार्टफोनवर ₹5000 पर्यंत डिस्काउंट
Just Now!
X