News Flash

थरार… जेव्हा अजगराने संपूर्ण मगरच गिळली

अजगर किंवा मगरीच्या तावडीत कोणी सापडले तर त्याचा मृत्यू अटळच आहे

अजगर किंवा मगरीच्या तावडीत कोणी सापडले तर त्याचा मृत्यू अटळच आहे असे समजावे. पण ज्यावेळी या दोघांमध्येच वाद सुरू होतो. तेव्हा नेमकं कोण जिंकेल? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमचे उत्तर मगरच असेल. कारण अजगरापेक्षा मगर ताकदवान आणि तोंडाचा आकार तसेच दातही तीक्ष्ण आहेत. त्यामुळे मगर अजगराला अगदी सहजपणे परास्त करू शकते असे वाटते. मात्र, एका अजगाराने चक्क मगरीलाच गिळंकृत केले. ऑस्ट्रेलियातील मगर आणि अजगराच्या लढतीचे अंगावर काटा आणणारे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

फेसबुकवर GGwildliferescueinc या खात्यावरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अजगर कसा हळूहळू मगरीला गिळत आहे हे स्पष्ट दिसत आहे. हे फोटो पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या मोठ्या ओलिव पाइथनचे फोटो आहेत. मगर आणि अजगराच्या या लढाईचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोक हे फोटो पाहून अचंबित झाले आहेत.

अजगर आणि मगरीमधील लढाई सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी यावर चर्चा करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 5:31 pm

Web Title: crocodile and python fights photos viral nck 90
Next Stories
1 स्वस्तात मस्त! केवळ ७० रुपयांमध्ये या शहरात घेता येईल घर
2 कोहली की बाबर, कोणाचा ‘कव्हर ड्राइव्ह’ सर्वोत्कृष्ट ? आयसीसीने शेअर केला व्हिडिओ
3 #MumbaiRains: खऱ्याखुऱ्या पावसानंतर पडला ‘मिम्सचा पाऊस’, पाहा व्हायरल मिम्स
Just Now!
X