डॅन बिल्झेरियन हे नाव इन्स्टाग्रामवर असणाऱ्या अनेकांना ठाऊक असणार. आपली श्रीमंती इन्स्टाग्रामवरील फोटोंमधून सतत दाखवणाऱ्या डॅनला ‘किंग ऑफ इन्स्टाग्राम’ म्हणून ओळखले जाते. गाड्या, महागडी घरे, विमाने, शस्त्रे, महागडी हॉटेल अशा अनेक ठिकाणी काढलेले डॅनचे फोटो तो इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करतो. डॅनचे जगभरात चाहते आहेत. भारतामधील चाहत्यांना डॅनला भेटण्याची सुवर्ण संधी आहे. डॅन सध्या मुंबईमध्ये आहे. भारतामधील सर्वात मोठा पोकर शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोकर चॅम्पियनशीपसाठी तो भारतात आला आहे. सध्यो तो मुंबईतील ताज लॅण्ड्समध्ये राहत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॅनची एकूण संपत्ती १५ कोटी डॉलर इतकी आहे. तो फोटोंमधून सतत आपल्या अती श्रीमंत लाइफस्टाइलचे दर्शन त्याच्या फॉलोअर्सला घडवत असतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास डॅन रिचर्ड मिले आरएम १-०३ हे घड्याळ घालतो. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय. तर या घड्याळाबद्दलची विशेष गोष्ट आहे ती त्याची किंमत. डॅन वापरत असलेल्या घड्याळाची किंमत चक्क १ कोटी ३६ लाख इतकी आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर या किंमतीमध्ये भारतातील कोणत्याही टू टायर शहरामध्ये दोन बंगले विकत घेता येतील इतकी या घड्याळाची किंमत आहे. हे खास घड्याळ मॅकलरेनच्या गाडीच्या डिझाइनपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आहे. या घड्याळाला टायटॅनियम पुशर्स आणि टायटॅनियम क्राऊन आहे. या घड्याळातील अनेक गोष्टी मॅकलरेन गाडीच्या डिझाइनशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत.

अमेरिकेतील फ्लोरिडामधील थांम्पा येथे डॅनचा जन्म झाला. तो एक पोकर खेळाडू असून त्याचा भाऊ अॅडम बिल्झेरियन हा सुद्धा एक नावाजलेला पोकर खेळाडू आहे. डॅनचे वडील हे अमेरिकेतील वॉल स्ट्रीट कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. २००० साली डॅनने अमेरिकन नौदलात सील कमांडो म्हणून भरती होण्यासाठी प्रवेश परिक्षा दिली मात्र त्यात त्याला यश आले नाही. त्यानंतर डॅनने फ्लोरिडा विद्यापिठातून व्यापार आणि गुन्हा व गुन्हेगार याविषयींचे शास्त्र या विषयांचा अभ्यास केला.

डॅन याने काही सिनेमांमध्येही काम केले आहे. ऑलंपस हॅज फॉलन (२०१३), द इक्वीलायझर (२०१४) हे त्यापैकी गाजलेले चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dan bilzerian shows up in india wearing a watch worth more than a villa in india scsg
First published on: 16-09-2019 at 14:08 IST