X

पद्मश्री प्राप्त डॉक्टरांनी एकट्यानेच जाऊन घेतली करोना व्हॅक्सिन, पत्नीने Live Video मध्ये काढली खरडपट्टी

"मी घरी येऊन बोलतो, आता मी लाइव्ह आहे" असं सांगून डॉक्टर साहेब पत्नीचा राग शांत करण्याचा प्रयत्नही करतात, पण...

नवरा-बायकोमध्ये खटके उडणं सामान्य बाब आहे. पण, नवरा बायकोतले हेच खटके जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह व्हिडिओ सेशन सुरू असतानाच उडाले तर तो व्हिडिओ तर व्हायरल होणारच. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओची खासियत म्हणजे देशातील प्रसिद्ध डॉक्टर आणि पद्मश्री पुरस्कार मिळालेले इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष के.के. अग्रवाल व त्यांच्या पत्नीच्या संभाषणाचा हा व्हिडिओ आहे. डॉ. के.के. अग्रवाल यांनी पत्नीला सोबत न घेऊन न जाता एकट्याने करोना व्हॅक्सिन घेण्याची चूक केली आणि त्यानंतर जे झालं ते इंटरनेटवर व्हायरल होतंय. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पत्नी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसतेय.

एकट्याने व्हॅक्सिन घेतल्याची चूक केल्यानंतर डॉक्टर साहेबांनी लाइव्ह व्हिडिओ सेशन सुरू असताना पत्नीचा फोन उचलण्याची दुसरी चूक केली आणि पत्नीने त्यांची खरडपट्टी काढण्यास सुरूवात केली. खरं म्हणजे एकटेच व्हॅक्सिन घेण्यासाठी गेल्यामुळे डॉक्टरांची पत्नी चिडली होती. त्यांना इतका राग आला होता की त्यांचा ओरडण्याचा आवाज फोनबाहेर स्पष्ट ऐकायला येत होता. आता ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. कारमध्ये बसून लाइव्ह सेशन करत असतानाच त्यांना पत्नीचा फोन येतो. डॉक्टर साहेब फोनवर वारंवार पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करतात की ते फक्त व्हॅक्सिनचं लसीकरण सुरू आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी गेले होते, पण आता कोणीही नाहीये त्यामुळे लसीकरण करुन घ्या असं सांगितलं म्हणून मी केलं. तर, पत्नी वारंवार त्यांना मला का नाही घेऊन गेलात, खोटं बोलू नका असं सुनावत असल्याचं ऐकायला येतंय.

‘मी घरी येऊन बोलतो, आता मी लाइव्ह आहे’ असं सांगून डॉक्टर आपल्या पत्नीला शांत करण्याचा प्रयत्नही करतात. पण, पत्नी त्यांचं काहीही ऐकून घेत नाही. इतकंच नाही तर फोन ठेवताना ‘मैं भी अभी लाइव आ के तुम्हारी ऐसी की तैसी करती हूं’ असंही त्यांची पत्नी म्हणताना दिसतेय. बघा व्हिडिओ :-हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

20
READ IN APP
X