पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा सर्वात लोकप्रिय प्राणी आहे. इमानदार, प्रेमळ, निष्ठावान, संरक्षक अशा कारणांसाठी श्वानांना पहिली पसंती मिळते. हा प्राणी आपल्या मालकावर जिवापाड प्रेम करतो, असे म्हटले जाते. परंतु त्यांच्या या प्रेमामुळे मालकाचा जीव देखील जावू शकतो. अशीच एक अवाक करणारी घटना अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात घडली आहे. येथे एका कुत्र्याने आपल्या मालकीणीची चक्क गोळी घालून हत्या केली आहे.

हत्या करणाऱ्या आरोपी कुत्र्याचे नाव मॉली असे असुन, त्याने ७९ वर्षीय टिना स्प्रिग्नर यांची हत्या केली आहे. पोलिसांनी या कुत्र्याला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर आता खटला देखील चालवला जाणार आहे.

कुत्र्याने हत्या कशी केली?

मॉली आणि त्याची ७९ वर्षीय मलकीण टिना स्प्रिग्नर नेहमीप्रमाणे सकाळी गाडीतून फिरायला गेले होते. मॉली मागच्या सीटवर आरामात बसला होता. दरम्यान गाडी रस्त्यावरुन भरदाव पळत असताना एक व्यक्ती गाडीसमोर आला. अचानक आलेल्या व्यक्तिमुळे टिना गोंधळल्या आणि त्यांनी इमरजेंसी ब्रेक लावला. भरदाव पळणारी गाडी अचानक थांबल्यामुळे मॉली मागच्या सीटवरुन पुढच्या सीटवर उडाला. दरम्यान चालकाच्या शेजारच्या सीटवर ठेवलेल्या २२ कॅलिबरच्या पिस्तुलावर चुकून त्या कुत्र्याचा पाय पडला. त्याच वेळी त्या लोड केलेल्या पिस्तुलाचा चाप चुकून ओढला जाऊन, सुटलेली गोळी मालकीणीला लागली. अचानक लागलेल्या गोळीमुळे टिना गोंधळल्या आणि त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. दरम्यान गाडीच्या अपघातात त्यांचा मृत्यृ झाला.