News Flash

Viral Video : मित्राला पाण्यात ढकलण्यासाठी छोट्या हत्तीने काढली खोडी, मागून मारला धक्का आणि नंतर…

हत्तीच्या पिल्लांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

(Photo Credit : @susantananda3 ट्विटर )

हत्तीच्या पिल्लांचा मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मस्ती करणाऱ्या या छोट्या हत्तींचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणर नाही.

या व्हिडिओमध्ये नदीच्या किनारी उभे असलेले दोन छोटे हत्ती दिसतायेत. त्यातील एक हत्ती पाण्यापासून जरा लांब उभा राहिलेला दिसतोय. पण, दुसरा खोडकर हत्ती हळूहळू लांब उभ्या असलेल्या हत्तीच्या मागे येतो आणि त्याला मागून जोरात धक्का देऊन पाण्यात ढकलतो. त्यानंतर पडलेल्या या हत्तीची झालेली फजिती बघायलाही तो खोडकर हत्ती पाण्याजवळ जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.


मस्ती करणाऱ्या या छोट्या हत्तींचा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. काल हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला असून आतापर्यंत 62 हजारांहून जास्त जणांनी हा व्हिडिओ बघितला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 5:05 pm

Web Title: elephant baby pushing his friend into water adorable video is going viral sas 89
Next Stories
1 १२ वर्षाच्या मुलाची क्रिएटीव्हीटी पाहून व्हाल थक्क; थेट रेल्वे मंत्रालयानेही घेतली दखल
2 ४३ हजार किमीची गफलत महागात; जे. पी. नड्डा झाले चांगलेच ट्रोल
3 ‘हा’ व्हिडिओ पाहून जिनपिंग म्हणतील, “चिनी सैनिकांचे ओव्हर अ‍ॅक्टींगचे ५० रुपये कापा”
Just Now!
X