गुगलवर ‘भिकारी’ असं सर्च केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो येत आहे. गुगलवर दिसत असलेल्या फोटोमध्ये इम्रान खान यांची दाढी वाढलेली दिसत असून हातात वाडगं घेऊन भीक मागताना दिसत आहेत. इम्रान खान यांच्या फोटोशी छेडछाड केली असून त्यांना गुगलवर ट्रोल केलं जात आहे.

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यावर मात करण्यासाठी इम्रान खान यांनी अनेक देशांकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दाखवण्यासाठी इम्रान खान यांच्या फोटोशी छेडछाड केल्याचे म्हटले जात आहे.

Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
newzealand visa rules changed
भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

सोशल मीडियावर इम्रान खान यांना ट्रोल केलं जात आहे. नेटकऱ्यांनी इम्रान खान यांना अनेक मिम्स तयार करून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमधील नेटकऱ्यांनी या घटनेमागे भारतीय नेटकरी असल्याचे म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीने गुगल अल्गोरिदम किंवा गूगल बॉम्बिंगशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असणार आहे.

गुगलचे सर्च इंजिन अल्गोरिदम असे काम करते –
आपण जेव्हा या सर्च इंजिनमध्ये एखादा शब्द टाइप करतो त्याच वेळेस ही संगणक प्रणाली किमान १०० कोटी वा कमाल कितीही अशा शब्दांच्या समूहांना २०० निकषांची चाळणी लावतो. हे दोनशे घटक असतात संदर्भ, लोकप्रियता, कालसापेक्षता, सदर शब्द आधी कोणाकोणाच्या संदर्भात वापरला गेलाय.. वगैरे अनेक. त्यांतनं चाळण लागून मग काही पर्याय समोर येतात. ते जवळपास अचूक असतात. कारण इतके शब्द आणि त्यांच्या छाननीचे निकष याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं.