26 November 2020

News Flash

क्रिकेट खेळा आणि 2000 रुपये जिंका, Google Pay ची भन्नाट ऑफर

या गेममध्ये तुम्ही केवळ फलंदाजी करु शकतात, आणि जसजशा धावा वाढतील तुम्हाला...

सध्या सर्वत्र आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 ची चर्चा आहे, त्यामुळे क्रिकेटद्वारेच युजर्सना आकर्षित करण्याचा ‘गुगल पे’चा प्रयत्न आहे. ‘गुगल पे’ या अॅपवर आता एक क्रिकेट गेम आला आहे. Tez Shots नावाचा हा गेम खेळून 2 हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. प्रत्येक बॉलवर फटका मारल्यास धावा मिळतील आणि 100 धावा, 500 धावा किंवा त्याहून अधिक स्कोर केल्यास स्पेशल स्क्रॅच कार्ड मिळेल. विशेष म्हणजे एकाचवेळी तुम्हाला सगळ्या धावा करायच्या नाहीत, जेव्हाही तुम्ही गेम खेळाल त्यावेळी एकूण धावसंख्या वाढेल.

‘गूगल पे’ हे एक पेमेंट गेटवे अॅप आहे, याद्वारे युजर्सना कॅशबॅक आणि डिस्काउंट यांसारख्या अनेक ऑफर्स मिळतात. याच्या मदतीने सहजपणे पैसे ट्रांसफर करता येणं शक्य आहे. हे अॅप ओपन केल्यानंतर ‘तेज शॉट्स’  गेम खेळण्यासाठी सर्वात खालपर्यंत स्क्रोल करावं लागेल. तेथे बनलेल्या ‘तेज शॉट्स’ गेमच्या चिन्हावर टॅप केल्यास गेम सुरू होईल आणि तुम्ही बक्षीस जिंकू शकतात. या गेममध्ये तुम्ही केवळ फलंदाजी करु शकतात, आणि जसजशा धावा वाढतील तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळतील. जितक्या वेळेस पाहिजे तितक्या वेळेस तुम्ही हा गेम खेळू शकतात. एकूण धावा वाढल्यानंतर तुम्हा मिळणाऱ्या रिवॉर्ड्समध्येही वाढ होईल. हा गेम खेळताना तुम्हाला बिल पेमेंटसाठी स्क्रॅच कार्ड देखील मिळतील. किती रुपयांंचं स्क्रॅच कार्ड आहे हे तुम्हाला स्क्रॅच केल्यानंतरच कळेल.  या स्क्रॅच कार्डद्वारे तुम्ही 2000 रुपयांपर्यंत जिंकू शकतात. सर्वप्रथम 100 धावा केल्यानंतर 50 रुपयांपर्यंतचं स्क्रॅच कार्ड मिळतं, त्यानंतर 500 धावा झाल्यानंतर दुसरं स्क्रॅच कार्ड मिळेल. यामध्ये 100 रुपयांपर्यंत मिळू शकतात.  अशाचप्रकारे  1000, 2000 आणि 3000 धावांसाठी वेगवेगळे स्क्रॅच कार्ड्स मिळतील आणि यातून  2000 रुपयांपर्यंत कितीही रुपये तुम्ही जिंकू शकतात. यातील कोणत्या स्क्रॅच कार्डवर किती रुपये मिळतील हे नक्की सांगता येऊ शकत नाही, ते तुमच्या नशिबावर अवलंबून असेल, कारण 2000 रुपयांच्या कार्डवरही केवळ 15 किंवा 18 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2019 4:53 pm

Web Title: google pay tez shots earn up to rs 2000 by playing cricket sas 89
Next Stories
1 VIDEO: भारतातील शेतकऱ्याने उभारला ट्रम्प यांचा ६ फुटांचा पुतळा
2 VIDEO: रिलमधून रिअल लाइफमध्ये अवतरला आयर्नमॅन
3 Video : सोनाली बेंद्रेसोबतच्या प्रेमसंबंधांबाबत अखेर शोएबने सोडलं मौन
Just Now!
X