News Flash

VIDEO : गुजरातमध्ये सिंहाच्या भुकेल्या छाव्यांची क्रूर थट्टा

काही गावकरी कोंबडीचं आमिष दाखवून छाव्यांची क्रूर थट्टा करताना दिसत होते. या संपूर्ण प्रकारची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

VIDEO : गुजरातमध्ये सिंहाच्या भुकेल्या छाव्यांची क्रूर थट्टा
गीर अभयारण्याशेजारच्या गावातील अनेक लोक अशाप्रकारे सिंहाना खाण्याचं आमिष दाखवून खेळ खेळतात.

गेल्याच महिन्यात भुकेल्या सिंहाची क्रूर थट्टा करत असलेल्या सात जणांना अटक केली होती. भुकेल्या सिंहापुढे अन्नाचं आमिष दाखवून या मुक्या जीवांशी खेळ करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी गुजरातमधल्या जाखिया गावातून अटक केली होती. या गोष्टीला महिना उलटत नाही तोच आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

काही गावकरी कोंबडीचं आमिष दाखवून छाव्यांची क्रूर थट्टा करताना दिसत होते. या संपूर्ण प्रकारची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेक प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ देखील गेल्याच महिन्यात अटक केलेल्या सात जणांनी तयार केला असल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गीर अभयारण्याशेजारच्या गावातील अनेक लोक अशाप्रकारे सिंहाना खाण्याचं आमिष दाखवून खेळ खेळतात. या खेळाचे त्यांना चांगले पैसेही मिळतात.

गुजरातच्या राज्य प्राण्याचा दर्जा आशियायी सिंहाला देण्यात आला आहे. आशियायी सिंहांना गीर अभयारण्यात संक्षरण दिल जातं. या अभयारण्याच्या शेजारी अनेक गावं आहेत. या गावांत सिंहाचा मुक्त वावर असतो, पण आता इथल्या लोकांनी या हिंस्र प्राण्याच्या दहशतीला न घाबरता पैशांसाठी त्यांची क्रूर थट्टा करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आधीच संख्या घटत चाललेल्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणखी कडक कायदे करा अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 4:58 pm

Web Title: gujarat locals tease lion cub with chicken again video viral
Next Stories
1 लाखो संगीतप्रेमींना आता केवळ एका पिल्लाची प्रतीक्षा, होणार का सर्वात मोठा म्युझिक शो?
2 Social Media Day BLOG : ‘नमो’भक्त नी ‘नमो’रूग्णांचा उच्छाद
3 Social Media Day: ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स