न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. मैदानावर नेहमी शांतपणे वावरणारा आणि खिलाडुवृत्तीसाठी ओळखला जाणारा विल्यमसन आपल्या खासगी आयुष्याबद्दल फारशी वाच्यता करत नाही. विल्यमसनने आतापर्यंत आपल्या गर्लफ्रेंडबद्दलही शक्य तेवढी गोपनियता बाळगली आहे. आज आम्ही, तुम्हाला न्यूझीलंडच्या कर्णधाराच्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत.
सारा रहीम असं विल्यमसनच्या गर्लफ्रेंडचं नाव असून ती पेशाने नर्स आहे. या दोघांची प्रेमकाहणीही खूप रंजक आहे. केन विल्यमसन एकदा उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. यावेळी त्याने साराला पहिल्यांदा बघितलं. पाहताच क्षणी केनला सारा आवडली. यानंतर दोघांनीही भेटायला सुरुवात केली आणि या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिलेलं आहे, पण केन आपल्या खासगी आयुष्याबद्दल फारसं बोलत नाही.
काही महिन्यांपूर्वी साराचं नाव पाकिस्तानशी जोडलं गेलं होतं. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार सारा ही मुळची पाकिस्तानशी असल्याचं सांगितलं होतं. यावरुन बराच वादही झाला होता. सारा ही मुळची इंग्लंडची आहे आणि यानंतर कामानिमीत्त ती न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाली. परंतू काही लोकांच्या म्हणण्यानुसार साराचे पूर्वज हे पाकिस्तानतले असून यानंतर ते न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. कदाचीत याच कारणामुळे न्यूझीलंडचा कर्णधार आपल्या खासगी आयुष्याबद्दल फारसा व्यक्त होत नसावा. परंतू सेलिब्रेटी खेळाडूंचं आयुष्य हे एखाद्या खुल्या पुस्तकासारखं असतं. यातल्या अनेक गोष्टी कालांतराने समोर येतातच.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 5:40 pm