News Flash

Tik Tok चा जुगाड करण्यासाठी गुगलवर शोधाशोध

टिकटॉक जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल अॅप्लिकेशनपैकी एक म्हणून ओळखले जाते.

भारतातील अनेक टिकटॉक चाहत्यांना या अॅपवर बंदी घालण्यात आल्याची माहिती बहुदा अद्याप मिळालेली नाही.

गुगलने प्ले स्टोअर वरून टिकटॉक हे अॅप काढून टाकले आहे. त्यामुळे अँड्रॉईड आणि IOS या दोन्ही प्रणालीच्या मोबाईलधारकांना आता यापुढे टिकटॉक अॅप डाउनलोड करता येणार नाही. परंतु प्ले स्टोअरवरुन हे अॅप बंद झाले असले तरी, चाहते अद्याप शांत बसलेले नाहीत. त्यांनी गुगल सर्च इंजीनवर अन्य ठिकाणी या अॅप्लिकेशनचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

लहानसे मजेदार व्हिडीओ तयार करण्यास मदत करणारे टिकटॉक जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल अॅप्लिकेशनपैकी एक म्हणून ओळखले जाते. आजवर जगातील १०० कोटींपेक्षा अधिक लोकांनी या अॅपला डाऊनलोड केले आहे. भारतात हे अॅप बंद होताच आपल्यापैकी अनेकांनी how to download tik tok app असे गुगल सर्च इंजीवर शोधायला सुरवात केली. गुगल सर्च ट्रेंड्सच्या माहितीनुसार Download tik tok आणि Download tik tok App या किवर्ड्सच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांत सर्वात जास्त वेळा शोधाशोध करण्यात आली आहे.

भारतातील अनेक टिकटॉक चाहत्यांना या अॅपवर बंदी घालण्यात आल्याची माहिती बहुदा अद्याप मिळालेली नाही. त्यामुळेच की काय गुगल व्यतिरिक्त युट्यूबवरही लोक टिकटॉक डाऊनलोड करण्याचे पर्याय शोधत आहेत. हे अॅप भारतात बंद झाले असले तरी टिकटॉक प्रमाणेच काम करणारी Vigo Video, LIKE Video, togetU ही अॅप्लिकेशन अद्याप सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 11:20 am

Web Title: how to download tik tok app search on google
Next Stories
1 Elections 2019: लग्नानंतर थेट गाठलं मतदानकेंद्र
2 १८ एप्रिल १९३०: जाणून घ्या बातम्या नसलेल्या दिवसाची रंजक कहाणी
3 वजन घटवण्यासोबतच ग्रीन टीचे असेही काही फायदे
Just Now!
X