X

ट्रॅफिक सिग्नलला वैतागल्या असंयमी चालकानं पाहा काय केलं

ट्रॅफिक सिग्नलवर थांबायचा या व्यक्तीला इतका राग आला की असंयमी व्यक्तीनं जे कृत्य केलं ते कॅमेरात कैद झालं आहे.

सिग्नल न पाळणारे लोक फक्त आपल्याकडेच आहे असं नाही. अनेकांना अगदी काही सेकंदही सिग्नलवर थांबणं असह्य होतं. तेव्हा अतिघाई करणारे असे लोक जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. असाच एका असंयमी व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रॅफिक सिग्नलवर थांबायचा या व्यक्तीला इतका राग आला की असंयमी व्यक्तीनं गाडीतून खाली उतरून चक्क ट्रॅफिक सिग्नलचा पोल तोडून टाकला आहे. बराच वेळ सिग्नलवर थांबूनही सिग्नल सुटला नाही म्हणून त्या व्यक्तीनं रागात सिग्नलचा पोल तोडला आहे. रस्त्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात हा व्हिडिओ कैद झाला आहे.

नंतर या प्रकारासाठी वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून चांगलाच दंड आकारला आहे तसेच काही दिवसांसाठी त्याचा वाहतूक परवानाही रद्द केला आहे. चीनमधील एका शहरात हा प्रकार घडला आहे.